दिनेश. यांचे रंगीबेरंगी पान

हॅमिल्टन गार्डन, क्रिष्टल माऊंटन, पीहा बीच वगैरे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

न्य़ू झीलंड ला, गेल्या जूनमधे गेलो होतो, त्यावेळी तिथे कडाक्याची थंडी होती. घरीच हीटरसमोर शेकत बसावे लागत असे. म्हणून मग यावेळी त्यांच्या उन्हाळ्यात, म्हणजे डिसेंबरमधे गेलो होतो. ऑकलंड ला जायला, आपल्याकडून थेट फ़्लाईट नाहीच. यावेळी कोरियन एअरलाइन्स ने व्हाया इंचॉन असे गेलो होतो. तो विमानतळ मस्तच आहे. तिथे बराच वेळ थांबलो होतो. बाकी खरेदी वा खाण्यापिण्यापेक्षा, मला तिथले (विमानतळावरच) सतत होत असलेले, नृत्य संगीताचे कार्यक्रम जास्त आवडले. इथे तिथे फ़िरण्यापेक्षा, मी या कार्यक्रम बघण्यातच वेळ घालवला.

विषय: 
प्रकार: 

संगणक आणि मी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी काहि आय टी वाला नाही. प्रोग्रॅमिंग माझा विषयही नाही. हौस म्हणून मी अनेक प्रोग्रॅमिंग लॅग्वेजेस
शिकलो असलो, तरी त्यात मी करियर केले नाही. पण तरिहि, त्या पासून अलिप्त राहू शकलो नाहीच.
तूमच्यापैकी बरेचसे जण या क्षेत्रातले व्यावसायिक आहात, याची कल्पना आहेच, तरिही हे लिहायचा
आगाऊपणा करतोय.

मला वाटते संगणकाचा पहिल्यांदा उल्लेख मी ऐकला, तो शाळेय जीवनात. आमचे परिक्षेचे पेपर आता
संगणक तपासणार, अशी भिती आम्हाला घातली जायची. ती भिती बागुलबुवा म्हणून आमच्यावर
वापरण्यात आली.

विषय: 
प्रकार: 

मी आणि माझा पासपोर्ट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पासपोर्टाचे आता काही अप्रूप राहिलेले नाही. खरा खोटा कुणाकडेही असतो.एखादेवेळेस रेशनकार्ड मिळवणे (तूम्ही दुष्मन देशाचे नागरीक असाल, किंवा काही खास धर्माचे असाल, किंवा काही खास राजकीय पक्षाशी संलग्न असाल, ते सोडा ) मुष्कील असेल, पण पासपोर्ट काय, कुणालाही मिळतो.
सध्या माझ्याकडे तीन तीन पासपोर्ट आहेत. (नाही हो, अजून माझे शेजारी देशांशी, तितके जिव्हाळ्याचे संबंध नाहीत.)

आणि या तीन पास्पोर्टांच्या तीन तहा आहेत.

विषय: 
प्रकार: 

निकाल

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१५ नोव्हेंबर २००७. या दिवशी या सर्व पर्वाचा अंत झाला. सुरवात झाली २८ एप्रिल २००० रोजी. पण खरी सुरवात झाली
ती १८ मार्च १९९३ रोजी. त्या काळात असे वाटत होते कि याचा अंत कधीच होणार नाही का ?

प्रकार: 

ताकापूनामधली फूले २

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हि आणखी काही फुले,

सुरुसारखी पाने असणार्‍या एका झाडावर असे तूरे जागोजाग दिसत होते.

nz8_0.jpg

पाकळ्यांचा पोत अगदी तलम रेशमी !!

nz9_0.jpg

हा जरा वेगळ्या रंगाचा वाण

विषय: 
प्रकार: 

ताकापूनामधली फूले

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

न्यू झीलंड ला गेलो होतो त्यावेळी टिपीकल प्रोग्रॅम असा काहि नव्हता. नुसताच भटकत होतो. त्यावेळी टिपलेली हि अनोखी फुले. आधी लिहिल्याप्रमाणे जून म्हणजे तिथे हिवाळा.

विषय: 
प्रकार: 

लेक पुपुके

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऑकलंड ( न्यू झीलंड ) चे एक उपनगर, ताकापूना. तिथे समुद्रालगत एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्या परिसरातील हे फोटो. त्या सरोवराचे नाव, लेक पुपुके.

pp1.jpgpp2.jpgpp3.jpg

विषय: 

जिव्हाळा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दहावी होऊन आता तीस वर्षे होऊन गेली, तरीही आमच्या बापटबाईंची आठवण अजून ताजी आहे. आजही त्यांची तेजस्वी मूर्ती डोळ्यासमोर आहे. त्यांचा कुठलाच विद्यार्थी त्याना विसरणे शक्य नाही.

प्रकार: 

रंगीबेरंगी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बराच मोठा ब्रेक घेतलाय ना मी ?
अजून थोडे दिवस, मग येतोच इथे.

dipakali.jpg

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - दिनेश. यांचे रंगीबेरंगी पान