कल्हईवाला

कल्हई

Submitted by इब्लिस on 5 October, 2013 - 05:10

कित्येक वर्षांनंतर आज सकाळी आमच्याकडे 'येईऽ कल्हईऽ वालेऽ' अशी हाळी ऐकू आली.

लहानपणी कल्हईवाले दर ८-१५ दिवसांत येत असत, अन अंगणातल्या झाडाखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारपाजारच्या अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गम्मत पहात असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखिल. आजकालच्या मुलांना दाखवता यावे म्हणून कल्हई करण्याचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत, म्हणून मुद्दाम कल्हईवाल्यांना बोलावून घेतले. अन मायबोलीवरच्या मुलांनाही दिसावे म्हणून इथे लिहितो आहे.

कल्हई :

कल्हईवाला

Submitted by आनंदयात्री on 4 April, 2012 - 00:45

काय म्हणे तर तिचा एकदा नकार आला
बेघर दु:खाला मोठा आसरा मिळाला

सौंदर्याची व्याख्या त्यांना पटली नाही
त्यांना ठाउक होती केवळ 'ती' मधुबाला!

खरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या पडल्या
हळूच त्याचा व्यासंगी साहित्यिक झाला!

मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!

कौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली
ओळखही आवश्यक नसते हव्यासाला

कायम झटलो ज्यांच्यासाठी, तेही फसले
म्हणून गेले जाताना, "नौटंकी साला!"

मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला!

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कल्हईवाला