मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षित आहे )

Submitted by अनिल तापकीर on 27 April, 2012 - 02:55

हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे
***************************************************************
तो काळच असा होता कि त्यावेळी माझे मन पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. दर वर्षी श्रावणात ग्रंथ वाचण्यासाठी गावात मला बऱ्याच ठिकाणी मागणी असायची. (ऐकाणारांच्या मते ) मी वाचून अर्थ सांगितला कि सगळे समजते. त्यामुळे रात्री दोन ठिकाणी आणि सकाळी एका ठिकाणी ग्रंथ वाचण्यासाठी मी जात असे. याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नसे. तर त्यावेळी मी पूर्ण अध्यात्म मय झालो होतो. शिवाय पहिल्यापासून माझ्या मनात भक्तीची खूप आवड निर्माण झाली होती. लहान पणापासून ग्रंथ वाचण्याचा परिणाम असेल कदाचित.
वर्ष दीड वर्ष मी रोज नित्यनेमाने शिवपूजेसाठी मंदिरात जात होतो. पूजा साधीच करायचो पण मन लाऊन करायचो. पूजा झाल्यानंतर अक्षता म्हणून जे तांदूळ असायचे त्यातील थोडे तांदूळ मी बाहेर चिमण्यांसाठी ठेवायचो. (नि त्यामागे दुसरेही एक कारण असे होते कि चिमण्या मंदिरात येऊन मी पिंडीवर ठेवलेले तांदूळ खाऊ नये ) पण त्या चिमण्याच, बाहेरचे तांदूळ संपल्यानंतर त्या आत यायच्या नि पिंडीवरील तांदूळ खाऊन टाकायच्या. मी पिंडीवर अतिशय सुरेख मांडलेले तांदूळ विस्कटायचे राग यायचा पण तो गिळावा लागायचा. कारण मनात यायचे कि जर यांच्या रुपात परमेश्वर तांदूळ खायला येत असेल तर (श्रीकृष्णाने नाही का विदुराच्या कण्या खाल्ल्या होत्या ) मगमग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हि ओवी आठवत घरी जायचो.
असे खूप दिवस चालू होते. नंतर नंतर चिमण्यांची नि माझी जणू चांगली मैत्रीच झाली कारण माझी पूजा चालू असताना त्या अगदी माझ्या जवळ यायच्या नि परत उडून त्यांच्या घरात जायच्या त्यांचे घर तिथे मंदिरातच होते. पुरातन असलेले ते दगडी मंदिर होते. त्यामुळे चिमण्यांना राहण्यासाठी खूप (फटी) घरे होती. ग्रंथ वाचण्यामुळे मी बऱ्यापैकी अहिंसावादी झालो होतो. देवाचे सतत नामस्मरण करायचो. भजन म्हणायचो नेमाने आळंदी पंढरीची वारी करायचो. आणि हि शंकराची नित्य पूजा.

तर रात्री भजनाला जागल्यामुळे मी एकदा उशिरा उठलो. त्यामुळे गडबडीतच आंघोळ उरकली कारण पूजेला शक्यतो मी उशीर करत नसायचो. कपडे घालण्यासाठी मी बाहेर आलो तो तेवढ्यात चिमण्यांचा चिव चिवट कानावर आला. आणि दोन तीन चिमण्या माझ्या अगदी डोक्याजवळ येऊन ओरडू लागल्या. मी जरा चक्रावलोच कारण आमच्या घरात चिमण्या कधी येत नसायच्या आज या कश्या घरात घुसल्या.

मी कपडे घाले पर्यंत त्यांचा चिवचिवाट चालूच होता. कपडे घालता घालता माझ्या डोक्यात एक विचार सर्रकन आला. या मंदिरातील चिमण्या तर नव्हेत. आणि त्या च इकडे आल्या नसेल पण मग त्या एवढ्या दूर कशाला आल्या असतील. त्यांच्यावर काही संकट तर आले नसेल ना? असा विचार माझ्या डोक्यात आला.

नामस्मरण करत कपडे घालून पूजेचे साहित्य घेऊन मंदिरात जायला निघेपर्यंत त्या चिमण्या घरातच होत्या. नामस्मरण करत चाललो असल्यामुळे मंदिर येईपर्यंत मी चिमण्यांना विसरलो होतो. मंदिरात प्रवेश केला नि मला धक्का बसला. कारण चिमण्यांची अतिशय छोटी छोटी दोन पिल्ले खाली पडली होती. अतिशय नाजूक नि सुंदर असणाऱ्या त्या पिलांना पंख देखील फुटले नव्हते. खाली दगडी फरशीवर त्यांची वळवळ चालू होती.

आता मला वाटू लागले कि घरी आलेल्या चिमण्या मंदिरातीलच असाव्यात मदतीसाठी त्यांनी माझ्याकडे धाव घेतली असावी. पिलांना उचलून त्यांच्या घरट्यात ठेवण्यासाठी मी झटकन पुढे झालो.त्यांना हात लावणार तेवढ्यात मनात विचार आला. यांना स्पर्श करावा कि नको. कारण कुठेतरी ऐकले होते कि वाचले होते. कावळा किंवा चिमणी यांना माणसाचा स्पर्श झाला तर त्यांचे भाऊबंध त्यांना मारून टाकतात.

तसाच थांबलो विचार करू लागलो काय करावे याचा, त्या छोट्या जीवांकडे पाहून जीव तुटत होता. पिलांना घरट्यात जर ठेवले नाही तर त्यांचा म्र्युत्यू निश्चित होता. एक मन म्हणत होते कि चिमण्या मदतीसाठी बोलवायला घरी आल्या म्हणाल्यावर आपण स्पर्श केला तरी त्या पिलांना मारणार नाही. परंतु ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी होत्या मुक्या जीवांच्या भावना काय आहेत ते कसे कळणार.

विचार करता करता माझे लक्ष्य कोपऱ्यात गेले तिथे एक पत्रिकेचा कागद होता. लगेच तो घेतला नि त्याचे दोन भाग केले एक भाग पिलाच्या खाली अगदी हलक्या हाताने सारला.दुसरा भाग पिलू पडू नये म्हणून आडवा धरला. आणि उठून अगदी अलगद ते पिलू घरट्यात सोडले. दुसऱ्या पिल्लाच्या बाबतीत तीच कृती केली.आणि दोन्ही पिल्ले त्यांना माझा स्पर्शही न करता घरट्यात ठेवण्यात मी यशस्वी झालो मनाला खूप समाधान वाटले.

हे सगळे करेपर्यंत चिमण्यांचा चिवचिवाट चालूच होता. घरट्यात पिले ठेवल्यानंतर तो कमी झाल्यासारखे वाटले.

नंतर मी जवळ जवळ अर्धा तास मन लाऊन पूजा केली. आरती झाल्यानंतर मी घरट्याकडे पहिले नि इतका आनंद झाला कि काय सांगू कारण त्या पिलांची आई त्यांना काहीतरी खायला घेऊन आली होती. आणि ती पिल्ले आपली इवलीशी चोच वासून बाहेर डोकावत होती. चिमणीने आपल्या चोचीतला घास पिल्लांच्या चोचीत सारला होता.

मनाला आज कधीही न वाटणारे एक अलौकिक समाधान वाटत होते.

हा एक छोटा प्रसंग वाचून तुम्हाला काय वाटले.

माझ्या घरात घुसून चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या मंदिरातीलच असतील का?

मदतीसाठी मंदिरातील चिमण्या माझ्या घरी आल्या असतील का?

किंवा

घरातील चिमण्या नि मंदिरातील चिमण्या वेगवेगळ्या असतील आणि हा निव्वळ योगायोग असू शकेल काय?

आपले मत अपेक्षित आहे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अनिलभाऊ, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील कबूतराचा शॉट आठवला.

असो, गमतीचा भाग सोडला तर चिमण्या त्याच असायची शक्यता असेल वा नसेलही, पण आपला अनुभव मात्र भावला, खूपच छान. प्रसंग छोटाच असला तरी समाधान मात्र फार मोठे आपल्या मनाला देऊन गेला असणार हे नक्की.

.............................................................................

लहानपणी आमच्या चाळीत एक कबूतरप्रेमी बाई राहायची, ती जखमी कबूतरांची/चिमण्यांची शुश्रूषाही करायची. तेव्हा आम्हा मुलांना कुठे रस्त्यात, मैदानात, शाळेत येता जाता कुठेही जखमी पिल्लू असे दिसले की आम्ही उचलून घरी आणायचो आणि तिच्या ताब्यात द्यायचो. मग काही दिवसांने त्याला बरे करून ती पुन्हा भरारी घेण्यास सोडून द्यायची. तिच्या या कामात मदत करायचो यातही एक समाधान होते. आज तुमचा हा अनुभव वाचून या सार्याची आठवण झाली, धन्यवाद. Happy

माझ्या घरात घुसून चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या मंदिरातीलच असतील का?

मदतीसाठी मंदिरातील चिमण्या माझ्या घरी आल्या असतील का?

>>> असु शकेल. नव्हे असेलही.

आमच्या घरी चिमण्यांसाठी घरटी बांधलेली आहेत. त्यापुढे फीडर मध्ये तांदळाची कणी, बाजरी आणि पाणी सदैव असते. जर आम्ही कधी विसरलो तर चिमण्या चिवचिवाट करुन आम्हाला हाका मारतात. हॉल मध्ये दिसलो नाही तर स्वयंपाकघरात येउन गाठतात. त्यांचा विश्वास बसला की न घाबरता घरात सुद्धा येतात आणि खेळतात.

केलेले काम चांगलेच आहे, चिमण्या कुठल्याही असल्या तरी.
माणसाचा स्पर्श झालेली पिल्ले, पक्षी स्वीकारत नाहीत, ही समजूत माझ्यामते तरी
गैरसमजच असावी.

व्वा

आवडला हा अनुभव

धन्यवाद

असेच करावेसे वाटते लहान पिल्ले पाहिली की

Happy

अनिलजी तुमचा हा प्रसंग वाचुन तुमचि भुतदया कळते. आणी ह्या प्रसंगावरून तुकाराम महाराजांचा एक किस्सा आठवला तो मी त्यांच्या चरित्रात वाचला होतआ ते एकदा रस्त्याने श्जात असता चिमन्या त्यांना घाबरल्या या गोश्टींचे त्यांना खुप वाईट वाटले होते. आणि त्यांनी तिथेच अनूष्ठान केले जेव्हा चिमण्या परत येऊन त्यांच्या खांद्द्यावर बसल्य तेव्हाच त्यांना समाधान वाटले.

अनिलजी,खूप हृद्य अनुभव.खूप खरे उतरलात. या चिमण्या त्या चिमण्यांच्या हितचिंतक असू शकतील..

ग्रेसांच्या ललितलेखनात एक याविरुद्ध अनुभव त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलाय ते आठवले.

आणखीही एक ओळ आठवली

पक्षी म्हणती ज्या आपुला
बसती ज्याच्या खांदागळा
तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा..
लोकमान्यांच्या संदर्भात कुणीतरी केलेलं मूळ अभंगाचं मॉडिफिकेशन..मंडालेच्या तुरुंगात चिमण्या त्यांच्या अंगावर बसत, त्यांच्या हातातून अन्नकण घेत..

क्षणिक नि भारतीजी धन्यवाद,
लोकमान्यांविषयी हा प्रसंग माहित नव्हता, माहिति दिल्या बद्दल धन्यवाद

अनिलजी अहो त्या मंदिरातल्याच चिमण्या आहेत, देव आपली कुठल्या न कुठल्या रुपात परीक्षा घेतो, तुमची अतुट श्रद्धा आणे माणुसकी बघुनच त्याने तुमची परीक्षा घेतली आणी त्यात तुम्ही पास झालात.

देवाच्या परिक्षेत पास होण्याइतका मि मोठा नाही मी टुनटुनजी,देवाची परिक्षा खुप अवघड असते.मी फक्त मला योग्य वाटले ते केले.
धन्यवद

त्याच चिमण्या असणार नक्कीच्.........मझाही असच अनुभव आहे.......कावळ्यांच्या बाबतीत्.........असो...

वेधगंधाजी,धन्यवाद
आपन आपला ही अनुभव लिहावा वाचायला आवडेल. मुक्या जिवांना जर प्रेम दिले त्यांच्यासारखा मित्र दुसरा कोणीही नसतो.

खाणे शोधण्यासाठी आपल्याला वण वण करावी लागत नसली तरी त्यांना करावी लागते. चिमण्या कोणत्याही असल्या तरी त्यांचा एरीया मोठा असतो लक्षात असूद्या. घर आणि मंदिर जवळच आहे म्हणता, मग चिमण्या त्याच नक्की. आणि आपले क्रुत्य नक्कीच स्तूत्य आहे.