Submitted by अनिल तापकीर on 2 April, 2012 - 02:13
घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत
रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस
एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही
सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे
चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे...
छान आहे...
धन्यवाद जयदीप
धन्यवाद जयदीप
विचार चांगले
विचार चांगले मांडलेत.
लयबद्धतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे वाटले.
भिडे साहेब आपल्या सूचना अमलात
भिडे साहेब आपल्या सूचना अमलात आणण्याचा प्रयन्त नक्कीच करेन अशेच मार्गदर्शन करत राहा धन्यवाद