काजवा

काजवा

Submitted by निरंजन कुलकर्णी on 28 September, 2019 - 11:27

काजवा

डोळ्यात तुझ्या दिसतात मजला चंद्र आणि चांदण्या

अजूनही न कळे मला तू सत्य की मनातील कल्पना

कल्पनांच्या या जगातील चंद्राळलेली रात्र तू

अन तुझ्यातच चमकतो मी स्वप्रकाशी काजवा

काजवा

Submitted by vasant_20 on 25 February, 2016 - 23:15

आभाळ आपल आपणच पेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
कुणाची काठी हवी कशाला
मनगटातली ताकद दिसू दे जगाला
बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
अन् वाहेल मध्येच बेभान वारा
सावली तेंव्हा तू शोधु नकोस
आडोशाला जाऊन बसु नकोस
उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
सोन नाही का विस्तावात चमकत
सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
निर्भीड छातीने सगळ झेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
सूर्य झालास तर अतिउत्तम पण
काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
आपल आभाळ...

शब्दखुणा: 

काजवा

Submitted by vasant_20 on 25 February, 2016 - 23:05

आभाळ आपल आपणच पेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
कुणाची काठी हवी कशाला
मनगटातली ताकद दिसू दे जगाला
बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
अन् वाहेल मध्येच बेभान वारा
सावली तेंव्हा तू शोधु नकोस
आडोशाला जाऊन बसु नकोस
उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
सोन नाही का विस्तावात चमकत
सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
निर्भीड छातीने सगळ झेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
सूर्य झालास तर अतिउत्तम पण
काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
आपल आभाळ...

शब्दखुणा: 

पोरस ते सिकन्दर

Submitted by pradyumnasantu on 23 November, 2011 - 14:50

पोरसपासून सिकन्दर कसे बनावे

एवढासा काजवा
पण उर्मट फार
वीझ म्हटलं तर विझायला
नाही तयार
मग मी एक युक्ती केली
काजव्याचं टायमिंग पाहूनच हुकूम दिला
काजव्यानं मुकाट्यानं ऐकला
पेट,विझ,पेट,विझ,पेट,विझ भराभर
अशा त-हेने मी झालो पोरसचा सिकंदर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - काजवा