åविडंबन

ओळखा माझे नाव

Submitted by अजिंक्यराव पाटील on 29 March, 2022 - 08:48

ओळखलंत का सर मला आयडी बदलून आलं कोणी?
मायबोलीवर चालते माझ्या आयडींचीच वाणी.

कधी टाकतो लिंक स्वतःची कधी करतो लाल,
शाहरुख जिथे तिथे आणि वाचणार्यांचे हाल..

चांगले चांगले लिहिण्यासाठी आयडी ठेवलाय राखून,
इतर अनेक अवतार आहेत पाहण्यासाठी वाकून.

धागे हायजॅक करणे असे हाच माझा धंदा,
राग अनावर झाल्यावर खरा आयडी परागंदा..

येतो मग मी रूप घेऊन इतर खोटे खोटे
ज्यांनी केली निंदा त्यांना शिव्यांचे मग सोटे.

धागे वर काढण्यासाठी ठेवलेत काही आयडी,
ज्यांच्या योगे प्रतिसादांची चढत राहते माडी..

विषय: 
शब्दखुणा: 

अशी कबुतरे येती...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 March, 2016 - 08:13

सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती.

शब्दखुणा: 

अ "ष्ट" वक्र विडंबन काव्य

Submitted by प्रकाश कर्णिक on 12 August, 2012 - 00:15

प्राचीन काले भारत खंडे
होता एक विद्वान अन वरिष्ठ
नशिबी त्याच्या होती लेकुरे
उदंड अन एकाहुनी एक विशिष्ट

प्रथम पुत्र नाव त्याचे ठेविले जेष्ठ
काम नाही केले त्याने कोणतेही निकृष्ट
कोणी होता अति शांत अन संतुष्ट
त्याला म्हणे सर्व आहेस तू शिष्ट

झाला कोणी पुत्र वर्तनानी असे दुष्ट
दुर्योधनासही लाजवे व लोकां करे त्रष्ट
असे बलवान तो आणि बोलण्यात खाष्ट
वाटे जग सारे अन लोक त्यासी कनिष्ट

कन्या रत्न असे सुन्दर, करी सर्वां आक्रुष्ट
प्रेमाने तिला दिले नाव तुश्ट चविष्ट
कविता करे ति भारी च उत्कृष्ट
पण कथा तिच्या असत फारच क्लिष्ट

एक पुत्र असे सदासर्वदा रुष्ट

शब्दखुणा: 

तळतेस भजी तू जेव्हां -

Submitted by विदेश on 11 August, 2011 - 09:03

(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)

तळतेस भजी तू जेव्हां -
जीव 'सुटका सुटका' म्हणतो..
मिरच्यांचे वरती तुकडे
तोंडात घास का फिरतो ?

बघ फेटून पीठ- कसाही
का गोळा कच्चा जळतो !
ही जिव्हा रुचीहीन होते -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - åविडंबन