रंगरंगोटी - चि. विभास कुलकर्णी (वय ४.५ वर्षे)
कधी नव्हे ते एका बैठकीत गणपती बाप्पा रंगवले आहेत. बाप्पांचे डोळे निळे का? असे विचारले तर बाप्पांचे डोळे निळे असू शकत नाहीत का असा उलटा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आकाशात ढग नव्हते त्यामुळे ते काढण्यात आले आणि बरोबर उडणारे पक्षी आणि पाऊस आणि चमकणार्या वीजा ही आल्या. आणि आम्हाला कुठलेच झाड रिकामे आवडत नाही म्हणून त्यावर पिकलेली आणि कच्ची अॅपल्लस काढण्यात आलेली आहेत. आणि गणपती बाप्पा बर्फात रहातात म्हणून त्यांच्या पायापाशी निळा बर्फ काढलेला आहे.

