Submitted by लुक्या on 22 July, 2011 - 05:34
पुरे जहली तीच विराणी
गाणी आता जीर्ण पुराणी
आता गाऊ मुक्त स्वरांनी
मंगल गाणी दंगल गाणी
*****************
केव्हा तरी दुपारी हलकेच पेंग आली
वर्गातली मुले ती कॉपी करून गेली
******************
तू गेलीस अन शब्दातील सूरच हरवले
अधरावरचे स्वर माझे आज मूक झाले
पंचम आता बधीर झाला तुझ्या वियोगात
षड्ज मी शोधतो पण गवसेना या तिमिरात
*******************
काय घालू ओवाळणी , आज आहे बीज
गडबडीत सार्या राहून गेली करायची तजवीज
लक्ष लक्ष शुभेच्छांचे ओवतो आता मणी
गोड मनून घे तू , आज ही ओवाळणी
********************
गुलमोहर:
शेअर करा
सुचेल तसे लिहीत जावे शब्द
सुचेल तसे लिहीत जावे
शब्द फुले गुंफित जावे,
सर्वच फुले नसती सुवासीक
माला मात्र दिसती सुंदर.
बर्यापैकी छान सुचलय. लिहीत
बर्यापैकी छान सुचलय. लिहीत रहा.