नक्की

चंद्र एखादा तरी - आनंदयात्रीची गझल सुरांसह

Submitted by दाद on 8 March, 2013 - 00:49

http://www.maayboli.com/node/41197

आनंदयात्री .. नचिकेतची ही एक अप्रतिम गझल... वाचल्याक्षणी सुरांसह मनात उमटली.. इतकी तीव्र की इथे दिल्याशिवाय डोकं अन मन शांत होणार नाही ह्याची खात्रीच झाली.
सुरांवर, शब्दांवर प्रेम आहे माझं... पण मी गायक नाही. तेव्हा ह्या नितांतसुंदर गझलला न दुखवता काही सुरांत ढ्ळलं असेल तर... वाचले... नाहीतर समजून घ्या माझा वेडेपणा.

चंद्र एखादा तरी...

Submitted by आनंदयात्री on 18 February, 2013 - 04:52

दूर असु दे, पण तिथे असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?

पावलांना चालण्याची ओढ नाही
वेस ओलांडूनही थकणार नक्की!

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!

वाट मी पाहीन कायम, वेळ घे तू!
आज नाही तर उद्या सुचणार नक्की!

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!

नचिकेत जोशी

नक्की काय होते!

Submitted by नीधप on 20 April, 2011 - 01:08

माझी जुनीच कविता. 'आतल्यासहित माणूस' या प्रयोगातलीच.
--------------------------------------------

नि:शब्दाचे आभाळ
तुला मला व्यापून रहाते.
नक्की काय होते?

निराकार अथांग
सगळे वेढून घेते
नक्की काय होते?

काही उमटत नाही,
निश्चल हालचाल फक्त उरते.
नक्की काय होते?

काहीच घडत नाही,
निराश व्यापक उरी भरून येते.
नक्की काय होते?

आसू नाही, हासू नाही,
डोळ्यात रिकामपण उतरते.
नक्की काय होते?

श्वासावर श्वास
इतकेच जिवंतपण उरते.
नक्की काय होते?

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नक्की