चंद्र एखादा तरी - आनंदयात्रीची गझल सुरांसह

Submitted by दाद on 8 March, 2013 - 00:49

http://www.maayboli.com/node/41197

आनंदयात्री .. नचिकेतची ही एक अप्रतिम गझल... वाचल्याक्षणी सुरांसह मनात उमटली.. इतकी तीव्र की इथे दिल्याशिवाय डोकं अन मन शांत होणार नाही ह्याची खात्रीच झाली.
सुरांवर, शब्दांवर प्रेम आहे माझं... पण मी गायक नाही. तेव्हा ह्या नितांतसुंदर गझलला न दुखवता काही सुरांत ढ्ळलं असेल तर... वाचले... नाहीतर समजून घ्या माझा वेडेपणा.

ह्या गझल मधली ही "नक्की"पणाची समज, खात्री... ही आयुष्याच्या संध्याकाळची वाटते मला. आयुष्याच्या त्या समजुतदार अन समृद्ध गोरजवेळी... काही सांगायचय अशी मनाची भावना आहे. अनुभवसंपन्नतेनं काठिण्य आलेल्या हृदयातही मग हलतं काहीतरी. काय? ते कसच सांगता न ये... तरीही सांगून गेलीये ही अप्रतिम गज़ल.

गोरखकल्याण ह्या रागावर आधारित ही धून... संध्याकाळच्या ह्या रागाचं प्रयोजन वगैरे बैठकीवरच्या जाणकारांच्या गोष्टी आहेत. माझ्यासाठी शब्दं वाचता वाचता डोक्यात सुरू झालेल्या ह्या सुरांची ही मैफिल आहे.... जशी आहे तशी.
हा आगाऊपणा करायला परवानगी दिल्याबद्दल नचिकेतचे मनापासून आभार.

http://soundcloud.com/baabulamoraa/dur-asude-marathi-gazal

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा ऐकताना जाणवलेली चूक... चंद्र एखा... दातरी Happy
तसच शेवटच्या शेरात 'एकधा'...

ही शब्दप्रधान गायकी आहे... शब्दांचा योग्य मान ठेवला गेला पाहिजे हा माझाच आग्रह असतो.
ही नखवली जखम ह्या गझलने अन नचिकेतनं मोठ्या मनानं माफ करावी.

Sorry! Something went wrong

Is your network connection unstable or browser outdated?
मला पुन:पुन्हा हा संदेश दिसतोय. Sad

अप्रतिम !!
दाद........ अगं काय बोलू ......तुला एक घट्ट जादुची झप्पी Happy
फार फार सुरेख !!
काय मस्त वजन आहे गं तुझ्या आवाजाला...!!
हळुवार..हा शब्द एकदम कातिल गायलीयेस Happy
"चंद्र एखा दातरी " मला पण खटकलं.....पण ते सगळं माफ यार...... !!
जियो जानेमन जियो !!
नचिकेत.....भाग्यवान आहेस Happy

काय अप्रतिम गायलेस दाद तू हे .....

आधीच नचिकेतची गजल एकदम जबरी आणि त्यावर दादने चढवलेला हा स्वरसाज - दुधात साखर, केशर, विलायची सगळं, सगळं -

आजचा दिवस अगदी परम सुखाचा होऊन गेला.......

व्वाह!!

जयुच्या शब्दाशब्दाला अनुमोदन>> अगदी अगदी.
दाद, हाही आनंद दिलास,अन केवढ्या तरलतेने.किती भावगर्भ गातेस !
सलाम.ईश्वर तुला दीर्घ आयुरारोग्य देवो अन आम्हाला हे असले आनंद.

माझ्या जराशा बर्‍या शब्दांना मिळालेली सूरसंगत आवडलेल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार! >>>> काय नचिकेता ? आज एकदम "बाळ विनय" मोडमधे ?? कृ ह घे... Wink Happy

दाद, हा प्रतिसाद खास तुमच्यासाठी!

मायबोलीवर सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा आलो, तेव्हापासून माबोवर उत्तम लिहिणार्‍यांपैकी तुमचं नाव कायम लक्षात आहे. तुमच्या 'गानभुली'ची भूल खूप काल रेंगाळत राहिली होती..
'फरहान' आठवतोय, 'रुपक' आठवतोय, 'नक्ष फरियादी', तबल्याचे सर, जिव्हाळ्याचं बेट, आणि असे अजून बरेच कोणी कोणी, बरंच काही काही..

व्यक्तिचित्रं असो किंवा निसर्गचित्र.. दादने लिहिलंय म्हटलं की पर्वणीच असणार ही अपेक्षा जवळजवळ प्रत्येकवेळी पूर्ण झाली आहे...

आपण कधी प्रत्यक्ष भेटू की नाही ते माहित नाही, पण दूरदेशांमध्ये पसरलेल्या अनेक सुहृदांना व्हर्च्युअली एकत्र आणण्याचं आणि त्यांच्यामध्ये 'जिव्हाळ्याचे धागे' ओवण्याचं मोठं पुण्य माबोकडे जमा आहे... तुम्ही त्या सुहृदांपैकीच एक!

या गझलेला 'दाद'ने सूर दिला, हा एक भाग्ययोग वाटतो मला. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही संगीतकार आहात/नाहीत, वगैरे बाबींपेक्षा ही 'दाद'ने चाल लावली आहे, यातच मी ज्जाम खूष आहे... भावना पोचल्या असतील असं वाटतंय!

'चंद्र एखा... दातरी आणि एकधा...' हे ऐकताक्षणीच जाणवलं होतं, पण रागदारीचे नियम असावेत असं वाटून लिहिलं नाही, आणि तुम्हाला माफ करणारा मी कोण पामर हो!! का लाजवताय? Happy

माझ्या कवितेच्या नशिबी असे योग वारंवार यावेत, एवढीच 'त्या'च्याकडे प्रार्थना!

यात्रीचा प्रतिसाद मस्तच! पण दाद यांच्या सुरावटीने चार चाँद लागले. त्यामुळे 'चंद्र एखादा तरी' हे शीर्षक आता बदलावे लागेल. Happy

शीर्षकाचा शेर अतिशय सुंदर गायला गेला आहे. (अर्थात, यतीनुसार काही ठिकाणी शब्द तुटले आहेत, पण ते काहीच नाही अशी गझल आणि असे गझल गायन). दाद यांच्यामुळे गझलेचे चीज झाले असे यात्रींना वाटणे आणि यात्रींच्या गझलेमुळे दाद यांना सूर स्फुरले असे दाद यांना वाटणे हे दोन्ही तितकेच आनंददायी आणि पटण्याजोगे!

सुंदर सुंदर!

Happy

-'बेफिकीर'!

सगळ्यांचे मनापासून आभार.
आनंदयात्री... तुझे खास. हे सो कॉल्ड गायन (आता सगळे म्हणतायत म्हणून मी सुद्धा...) इथे द्यायची परवानगी देण्यासाठी.
<<या गझलेला 'दाद'ने सूर दिला, हा एक भाग्ययोग वाटतो मला<<>>...
नव्हे, रे. तुझं माझं सोड...
ती गझल अन ते सूर (कसे का होईना पण) नांदलेत ह्यातच आलं नाही सारं?

<< दूरदेशांमध्ये पसरलेल्या अनेक सुहृदांना व्हर्च्युअली एकत्र आणण्याचं आणि त्यांच्यामध्ये 'जिव्हाळ्याचे धागे' ओवण्याचं मोठं पुण्य माबोकडे जमा आहे >>
हे मात्रं अगदी अगदी खर.

मायबोलीकरांनी आणि म्हणून मायबोलीनं दिलेलं प्रेम, ही पूर्वपुण्याईच म्हणायची.
कुणीतरी म्हटलं होतं... आणि मला कबूल आहे... "आय अ‍ॅम ब्लेस्ड"... मी भाग्यवान आहे.

मस्त! मनापासून आवडलं...जसजसं ऐकत गेले तसतसं जास्त पोचत गेलं...चाल खरच सुरेख, शब्दांना न्याय देणारी...तुझा आणखी एक गुण समोर आला आणि इतक्या जवळ असून तुला भेटले नाही हा माझा कर्मदरिद्रीपणा ....हरकत नाही....कधीतरी भेटणारच आपण हा विश्वास बाळगते....