वरात

वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
तारीख/वेळ: 
19 July, 2014 - 10:55 to 18:55
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 

कविता माझी....!

Submitted by मस्तराम on 28 January, 2011 - 15:00

कविता माझी फुलत होती,
श्वासासंगे उमलत होती ,
गंध नव्या स्वप्नांचा लेवून,
कविता माझी बहरत होती...

कविता माझी निरागसतेची ,
तिला न कल्पना सत्याची,
सोंग वेड्या आशेचे घेवून,
कविता माझी जगत होती...

कवितेचा का असा लळा ?
रंग तिचा का असा वेगळा ?
त्या रंगातून जणू ती,
चित्र प्रेमाचे चितारत होती....

का क्षणात व्हावे असे कळेना,
कवितेशी माझा सूर जुळेना,
कविता काही सांगेना,
माझ्याशी काही बोलेना.....

मनात शिरून तिच्या पाहिले,
तेव्हा उघड गुपित झाले,
कविता माझी मनात होती आणि .....
रस्त्यावर तुझी वरात होती !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वरात