वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही तिकडे आल्यास कुणी रागवणार नाही, घाबरण्याची शक्यताही नाही.

कुजकट बोलणे, हेवेदावे वगैरे असेल पण त्याची तुम्हाला सवय आहे(च).

केव्हाही कळवा. न कळवता आलात तरीही कुणी स्वागत करणार नाही.

Proud

पुणेरी दहिवडे.
१) केवळ आगाऊ नावनोंदणी केली आहे अशाच उपस्थितांना मिळतील.
२) वड्यात डाळींबाचे दाणे, खोबर्‍याचे तुकडे, आले, मिर्ची हवे वा नको याबद्दलच्या आगाऊ सूचना आगाऊ केल्यास बहुमताप्रमाणे विचारात घेतल्या जातील.

३. वड्यांत दही कमी शिरल्यास आम्ही जबाबदार नाही.
(ते गायीच्या स्वभावानुसार ठरतं असं 'शास्त्र असे सांगते'मधे लिहिलं आहे. गरजूंना पुस्तकाची रिसीट दाखवण्यात येईल. त्याचा चार्ज एक्स्ट्रा पडेल.)
४. एक्स्ट्रा दह्याचा एक्स्ट्रा चार्ज पडेल
५. एका सज्ञान (म्हणजे कायद्याने सज्ञान. अमेरिकन कायदा.) व्यक्तीला दोनाच्या वर वडे मिळणार नाहीत.
६. कायद्याने अज्ञान मुलांना प्रत्येकी एकच वडा मिळेल.
७. २ वर्षांखालील मुलांना फक्त चमचाभर दही मिळेल.
८. दह्याला आणि दह्यातील पदार्थांना नावे ठेवू नयेत.

हुकुमावरून.

Proud

हो ना, फक्त स्वतःच्या करमणुकीचा विचार करतायत. जरा नि:स्वार्थीपणा दाखवा. त्या प्राचीला काय वाटेल Happy

हा मी आलो.

काईंडनेसचं कसं आहे देसायनू.....

तो पुर्णपणे सापेक्षं असतो. जसं की इथल्या काकवांना पौष्टिक बकरे, बि करे हलाल करणे हा काईंडनेस वाटतो.
Proud

या सगळ्यात माझे पोस्ट अगदीच एवेएठि संबंधित वाटत आहे. उडवून टाकू का? तेराव्या पानानंतर खरच एवेएठि आणि मेनूबद्दल चर्चा सुरू झाली की पुन्हा टाकतो.

तीन मेंब्रांना स्वतःचं हृदय म्हणून नाही आणि त्यांनी उरलेल्या मेंब्रांची हृदयं कचाकचा खाल्ल्यानं ते पण अंमळ हृदयलेसच.

जीएस.. असुदे... नेहमीच्या (एकामेकांशी काहीही संबंध नसलेल्या ) पोस्टीत खपून जाईल...

बरं .. बारके किती मोठे किती? ते सांगा..

आम्ही २+१.
गोगा, कोकणातल्या समुद्राला जागून काय ते Exotic आणा.

तुमचा काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे की नाही ? हल्ली इथल्या काही काकवा एका राहूल रॉयसदृश आंग्ल नटाच्या कच्छपि लागल्या आहेत असे कळते. त्याविषयी काहीतरी येऊ द्या Happy

त्याविषयी कोकणातल्या समुद्रातून काय येऊ शकेल या विचाराने मी इन्ट्रीग झाले आहे. Proud

जीएस : मोठे २, बारके १
आंबोळे : मोठे ३, बारके १
--------------------------------
एकूण : मोठे ५, बारके २

(तळटीप : या हिशोबात डोकी आणि हृदयं आणू नयेत. ही तोंडं आहेत. :P)

राहूल रॉयसदृश आंग्ल नटाच्या >>> Lol

या हिशोबात डोकी आणि हृदयं आणू नयेत. ही तोंडं आहेत. >>> Happy

अजून मैचित्र्यपूर्ण काही झाले नाही का येथे? की तिला क्रिएटर्स ब्लॉक आलेला आहे.

जी एस.. इथे बर्‍याच लोकाना कोकणातला समुद्र चालत नाही (अपथ्य) त्यामुळे त्यातून काही आणणे शक्य नाही. मागाहून शिव्या पडतात मला.. Happy

nathbday_0.JPG

ते दरवाज्यात थांबून " ??" करणारे तिघे म्हणजे प्राची , व्हि ताई, आणि एबाबा आहेत याची नोन्द घ्यावी Happy

Pages