राजा शिवाजी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
बघून या मस्त आहे.
मी सुरू करतो
सर्वात पहिले मी कबूल करतो की स्टारकास्ट बघून मी आधीच नकारात्मक मत बनवून ठेवले होते. त्याच वेळी चित्रपट शिवाजी महाराजांवर आहे तर चुकवायचा कसा याही द्विधा मनस्थितीत होतो. पण चित्रपट प्रदर्शित होताच कुठलाही किंतु परंतु मनात शिल्लक राहिला नाही. जर "छावा" संभाजी महाराजांना चित्रपटगृहात बघून आलो तर "शेर" शिवाजी महाराजांना बघायला जायचेच होते.
स्वराज्य घडविताना छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले ... तशाच काहिश्या प्रसंगातून आजच्या युगातील राम पाठारे ही व्यक्तिरेखा प्रवास करते.

मालवणला जायचे ठरवले तेव्हा मनात विचार आला की पार कोकणात जाणार मग येता येता रायगड वारी करायला काय हरकत आहे? ( तसाही मी संधीच बघत असतो गडावर जाण्याची). असेही तृप्ती ( माझी बायको) आणि ओम (माझा मुलगा) माझ्याबरोबर एकदाही रायगडावर आले नव्हते. तृप्तीलाही तिच्या सवतीची ( रायगड) ओळख माझ्याकडुन करुन घ्यायची होती. त्यामुळे तीचीही संमती मिळाली.
मालवणमध्ये पाच दिवस छान रंगलेल्या मैफिलीचा छान सुरेल शेवट झाला तो रायगड दर्शनाने....
रायगड पहाट
रात्रीने जाता जाता सुर्यदेवाच्या आगमनाची तयारीच की काय म्हणुन आकाशात रांगोळी काढुन ठेवली होती...