ऑकलंड भाग ५ - बोटॅनिकल गार्डन - इतर फूले (१)

Submitted by दिनेश. on 30 January, 2011 - 10:46

पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
तिसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/23011
चौथा भाग इथे आहे, http://www.maayboli.com/node/23039

फूलांचा राजा गुलाब, असे आपण आपले ठरवले आहे खरे पण त्यांच्या राज्यात सगळेच
राजे. कुरुप फूल अजून निर्माणच झाले नसावे.

त्या बागेत फ़िरताना, किती बघू, आणि किती फोटो काढू असे मला झाले होते. तशा
तिथे बहुतेक घरासभोवती बागा आहेतच आणि त्यात सुंदर सुंदर फूले आहेतच (काही
घरांच्या अंगणात तर फळे लगडलेली झाडे आहेत.) तरीपण या बागेतील फूले केवळ
अप्रतिम होती.

रंग, आकार, रचनेचे सौंदर्य सगळेच अप्रतिम. मी नेमका चष्मा घरी विसरलो होतो,
पण फूलांचे सौंदर्य बघायला मला काही अडचण येत नव्हती. आणि माझ्या नजरेलाही
न दिसू शकलेले बारकावे माझ्या कॅमेराने अचूक टिपले आहेत.

इथे त्या फूलांची रचना मी केलेली नाही. भरपूर प्रकाश होता हे खरे पण एखादे
फूल विरुद्ध दिशेला वा फार उंचावर असले, तरी मी हतबल होत असे. काही फूले
तर अगदी मातीत लोळत होती. ती मात्र मी हातात धरुन, त्यांचे फोटो काढले आहेत.
क्वचित एखादे पान मधे येत असेल तर ते मी बाजूला केले आहे, इतकेच.

मी आधी लिहिल्याप्रमाणे अर्धी बागच या दिवसात फूलली होती, बाकीची फूले
बघायला मला परत जावे लागेल. केवळ फूलझाडेच नव्हेत तर सूचीपर्णी, पाम,
केळी या कूळातली पण अनेक झाडे तिथे आहेत. काही झाडे २/३ वर्षांपूर्वीच
लावलेली आहेत. ती वाढून बहराला येईस्तो आणखी काही वर्षे जातील. पण अशा
बागा जोपासणे हा ब्रिटीशांना सुरु केलेला एक चांगला उपक्रम आहे. आपण ही अशा
बागा जोपासल्या पाहिजेत.

हे फोटो बघून कंटाळला नसाल अशी अपेक्षा आहे. हे मुद्दाम लिहिण्याचे कारण
कि या पाचही भागात न आलेली काही खास फूले आहेत. त्यांच्याबद्दल लिहिण्या
सारखे चार शब्द माझ्याकडे आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिन.

या फूलांची नावे तिथे लिहिली होती, पण मी ती लिहून घ्यायच्या फंदात पडलो
नाही, कारण त्याची गरज वाटली नाही.

(हो आणि आता सांगूनच टाकतो, प्रत्येक लेखाच्या आधी हे असे खरडण्याचे कारण
म्हणजे, फोटोंच्या मोठ्या आकारमानामूळे इथल्या जाहिराती झाकल्या जाऊ नयेत,
हा हेतू आहे. तात्पर्य हे खरडणेच आहे...)

मायबोलीकरांनी असे कळवले आहे को जास्त फोटो असतील तर ते पान उघडायला वेळ लागतो, म्हणून हे फोटो दोन भागात देत आहे.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८. हे आर्टिचोकचे फूल दोनदा द्यायचा मोह आवरता आला नाही.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६. या फूलाचे नाव, स्वान्स नेक (बदकाची मान) असे ठेवायचे का ?

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२. सूर्यफूलातही वेगळे रंग !!

२३.

२४.

२५.

२६.

२७.

२८. तिथल्या एका पूलाच्या खाली, हि फूले अशी पाण्यात लोळत होती.

२९.

३०.

३१.

३२.

३३.

३४.

३५.

३६.

३७.

३८.

३९.

४०. हे फूल तर अगदी मातीतच लोळत होते.

४१.

४२.

गुलमोहर: 

अरे बापरे Happy किती वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुले Happy

बरीचशी फुले पहिल्यांदाच पाहतोय.

धन्स दा इथे शेअर केल्याबद्दल. Happy

६, ७, १३, २४, ३७ ... झकास! काय आकार... काय रंग... मी तर आधीच्या भागातले गुलाब विसरलो!

तॄप्त तॄप्त तॄप्त !! Happy
दिनेशदा.. खूप खूप धन्यवाद या विविध रंगी फुलांची प्रचि दाखवल्याबद्द्ल !!