सोसायटी नावाची वाचाळ वस्ती. भाग १

Submitted by Sanjeev.B on 29 November, 2010 - 05:29

बरेच दिवस मनात होतं, काही तरी लिहायचे, पण काय लिहु, ते ठरत नव्हतं, मग ठरवलं कि आजु बाजु जे घडतंय ते लिहावं आणि एकदम मनात आलं कि आपल्या Society (पुर्वी आम्ही चाळ म्हणत होतो) वर लिहुया काही, फार Potential आहे ईथे घटनांची.
एक भाबडा प्रयत्न.

श्री

-: भाग १ :-
सौ : अहो, ऐकलं का.
मी : हम्म्म्म, बोला.
सौ : मी काय म्हणते, शॉपिंग ला जाऊ या ?
मी : वाटलंच मला. का ? आताच तर पैशे ऊडवुन झालेत ना दिवाळी ला, मग परत एव्ह्ढ्या लवकर, लोकं फटाके उडवतात दिवाळी ला, तुम्ही पैशे उडवलेत.
सौ : अहो, ती बाजुची मेहरा आहे ना .....
मी : काय घेतलं तिने ?
सौ : अय्या तुम्हाला कसे कळ्ळे ?
मी : सराव झालाय मला आता.
सौ : तिने किनई ...........
मी : पटपट बोला.
सौ : तिने किनई डबल डोर चे फ्रिज घेतले.
मी : मग, आपण पण घ्यायचं का?
सौ : मग काय.
मी : तिने घेतले म्हणुन आपण पण घ्यायचे, आपल्या कडे आहे ना सिंगल डोर चा.
सौ : पण तिने डबल डोर चा घेतला आहे.
मी : आपण आपल्या फ्रिज वर एक दरवाजा बसवुन घेऊ.
सौ : मस्करी करू नका.
मी : अच्छा, तिचा नवरा बार मध्ये जाऊन दारू पितो, समोरच्या चवळी ची शेंग शी त्याचं लफडं आहे, मी पण बार मध्ये जाऊन दारू पिऊ का, ऑफिस मध्ये लफडी करु का ?
सौ : चवळी ची शेंग ???
मी : म्हणजे ती रोझी गं.
सौ : मग भटक भवानी म्हणा ना, चवळी ची शेंग काय म्हणता.
मी : OK OK, ती भटक भवानी.
सौ : गप्प बसा, म्हणे दारू पिणार आणि लफडी करणार.
मी : मी गप्पंच होतो, तुच म्हणालीस ना, बाजु ची नी हे घेतलंय, ते घेतलंय, आपण पण घेऊया, मग मी पण म्हणालो बाजु चा हे करतो, ते करतो, मी पण करतो ना, तो काय काय करतो ते, आपण का बरे मागे रहावे, बरोबर ना.
सौ : अहो,घेऊ या ना Pleeeeeeeeeease (सौ ने आपले अस्त्र वापरले)
Pleeeeeeeeeease आणि अश्रु हे बायकांचे अस्त्र आहेत.
मी : हम्म्म्म, बघु.
सौ : माहितेय, तुमचं बघु म्हणजे ना ..............
मी : माहितेय ना.
सौ : उद्या मिटिंग आहे आपल्या सोसायटी ची, माहित आहे ना.
मी : कसली ?
सौ : अहो, सांगितलं तर होतं तुम्हाला त्या दिवशी, ३१ डिसेंबर ची सेलंब्रेशन आहे ना.
मी : OK OK.

क्रमशः ………

गुलमोहर: