मनोहरपंत एका खाजगी कपंनीत गेली दहा वर्ष कामाला होते

अशीही एक दिवाळी

Submitted by मिरिंडा on 29 October, 2026 - 22:56

           मनोहरपंत एका खाजगी कंपनीत गेले दहा वर्षं कामाला होते. ही त्यांची जास्तीत जास्त टिकलेली नोकरी. कंपनीत सारखी कामगारांची बोनस वरून तर कधी पगारवाढी साठी आंदोलनं होत होती . मागच्याच वर्षी आठ दिवसाचा संप झाला होता. पण युनियन स्ट्रॉंग नसल्याने मॅनेजमेंटने कामगारांच्या तोंडाला पानं पुसली. सध्याच्या दिवाळीचा बोनस कपंनीने धंदा तोट्यात असल्याने नाकारला होता.पण युनियन लीडर मेनन मुळे संप टळला होता. त्याने कंपनीकडून उशिरा का होईना पण बोनस देऊ असं लिहून घेतलं होतं. पण आज दिवाळी चार दिवसावर आल्यावर कंपनीने काही कामगार कमी केले. त्यात नेमकं मनोहरपंतांच नावं होतं.

Subscribe to RSS - मनोहरपंत एका खाजगी कपंनीत गेली दहा वर्ष कामाला होते