राधा
Submitted by दिनेश. on 10 November, 2010 - 05:25
"कोण आहे गं तिकडे ? दिवसाचे ३ प्रहर उलटून गेले, तरी या महाली आगमन झाले नाही अजून.
विसरली कि काय स्वारी ? आम्हाला कळत का नाही ? या महाली येऊन म्हणायचे, रुक्मीणी, तू आमची पट्टराणी. तूझा मान मोठा, आणि त्या महाली जाऊन म्हणायचे, तू सत्य माझी भामा, सत्यभामा." रुक्मीणीचा नूसता संताप झाला होता. आज स्वारी या महाली येणार होती म्हणून तिने सर्व सिद्धता करुन ठेवली होती.
घृतपूर, मोदक, क्षिरी भोजनासाठी, संगीतजलसे मनोरंजनासाठी, पुष्पशय्या सर्व काही होते. स्वारी आता त्या महाली, जायचेच विसरायला हवी, अशी मनिषा होती तिला.
गुलमोहर:
शेअर करा