हलके फुलके

तू कितीही नाही म्हणालीस तरी...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तू कितीही नाही म्हणालीस
तरी...
माझ्या डोळ्यांत तूच आहेस
डोळे उघडे ठेवू की बंद करू
एवढाच एक पेच आहे

बंद केले,
तर साहेबाचं संकट आहे
उघडे ठेवले -
तर तुझ्याशी प्रतारणा आहे

साहेबाचं संकट ओढावायचं
की डुलकीशी प्रतारणा करायची
एवढाच एक पेच आहे

बाकी,
माझ्या डोळ्यांत तूच आहेस...

प्रकार: 

स्वप्नींचे बन .....

Submitted by पुरंदरे शशांक on 10 November, 2010 - 02:33

स्वप्नींचे बन

वार्‍यावर निवांत डोलतंय फूल
पिंपळ सळसळ घालतीयं भूल
झर्‍याचा नाद, पाखरांची धून
डोंगरपायथ्याशी विसावलंय ऊन

अशा या रानात
स्वप्नींच्या बनात
एकटेच उडूया ......... भूर भूर

सोडून काळज्या
झटकून चिंता
टाकून निराशा ...... दूर दूर

मनातल्या मनात
स्वप्नात तर स्वप्नात
होऊन राहू .......... चूर चूर

गुलमोहर: 
Subscribe to RSS - हलके फुलके