साठ सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट ..........

वांझ

Submitted by मिरिंडा on 17 September, 2026 - 13:56

साठ सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. आमची एक मावशी होती. तिचं खरं नावं माहिती नाही. तिला आम्ही "बयो मावशी" म्हणायचो. ती आमच्या आईच्या चुलत बहिणीची मुलगी. ती दिसायला फार सुंदर अशी नव्हती. वय साधारण तिशीच्या पुढे. विटक्या तपकिरी रंगाची, अंगाने बारीक, साडेपाच फुटाच्या आसपास उंची, मोठ्या डोळ्यांची तरतरीत नाकाची आणि लहानसरं जिवणी असणारी, हसतमुख, आम्हा लहान मुलांशी गोड बोलणारी, एरवी अगदीच कमी बोलणारी. ती सतत काही ना काही कामात असायची. दुपारी केव्हातरी मागच्या ओटीवर पडायची. घरात विधवा आई, बयोचा मोठा भाऊ नारायणदादा पण होता. तो थोडा तिरसट होता. तो घरात असला की आम्ही चुपचाप बसायचो.

Subscribe to RSS - साठ सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट ..........