पाऊस आवडतो का ?

Submitted by निलेश बामणे on 13 July, 2012 - 04:54

पाऊस आवडतो का ?

मध्यरात्री पावसात ...

टप-टप गळणार्‍या झोपडीत...

आपल्या पाखरांवर टोप धरून..

बसलेल्या आई-बाबांना आपण..

विचारूच कस शकतो...

पाऊस आवडतो का ?

हातावर पोट असणार्‍या...

अंग झाकायला कपडे घेतानाही...

ज्याला विचार करायला लागतो..

असा माणूस जेंव्हा पावसात ..

छत्री नाही म्हणून भिजत असतो..

त्याला विचारूच कस शकतो..

पाऊस आवडतो का ?

घरात पावसाच पाणी शिरल..

म्हणून उरलसुरलेल्या सामानासह ...

खाटेवर संसार थाटणार्‍या आईला...

आपण विचारूच कस शकतो

पाऊस आवडतो का ?

पावसात रत्याने चालताना..

खड्यात पाय अडकून पडणार्‍या...

आणि मरता- मरता वाचलेल्याला..

कोणी विचारूच कस शकतो..

पाऊस आवडतो का ?

कवी-निलेश बामणे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आहे ही कविता
..........................हृदयस्पर्शी चित्रण !!

सुरेख !!

आवडली !!!!! (except last para)>>>>
शेवटच्या कडव्यासहीत आवडली.

कवितेचा विषय फार चांगला आहे. परंतू रचनेत थोडीफार गडबड वाटते व टायपो चा ही प्रॉब्लेम आहे. तेवढा संभळा.

पुलेशु.