शिवबा

शिवबाचि तलवार.

Submitted by अनघा कुलकर्णी on 16 September, 2013 - 04:16

शिवरायांची भवानी तलवार चाले -
जिने हिंदुधर्माचे रक्षण केले ,
निराधार प्रजेला संरक्षण दिले
निष्पाप प्रजेला भयमुक्त केले.
बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले ,
अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले I
मोगलाई बरखास्त झाली,
स्थापला महाराष्ट्र धर्म ,
लोकशाहीची तुतार फुंकली ,
सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले ,
अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले I
बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे ,
प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे ,
किती एक गड किल्ले काबीज केले.
अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले I
स्थापिले स्वराज्य झाला शिवबाला राज्याभिषेक,

शब्दखुणा: 

धन्य ती जिजाऊ शिवजन्मदात्री

Submitted by आनंद गोवंडे on 9 November, 2010 - 04:05

जिने पाहीला सूर्य अंधार रात्री
धन्य ती जिजाऊ शिवजन्मदात्री

उन्मत्त यवनांचे इथे राज्य होते
धर्म-न्याय-निती इथे त्याज्य होते
मदाने तयांच्या गांजली धरित्री

साडेतीनशे वर्ष अंधार होता
क्रूर लांडग्यांचा मुक्त संचार होता
इतरांपरी जी थिजली ना गात्री

गांजल्या जिवांना जीने हात दिला
स्वराज्य-स्वधर्म नवा मंत्र दिला
स्वातंत्र्य घोष उठे मध्यरात्री

शहाजीस बंदी करी आदिलखान
चिंता परी ना झुकू देई मान
खानास मात - दिल्लीस मैत्री

अफजल गर्जे दिन दिन दिन...
तुळजा भवानीवरी घाली घण
फडील अफजल शिवबा ही खात्री

शिवबास जी राष्ट्रकार्यास धाडी
म्हणे - अफजुल्ल्यास संपूर्ण गाडी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - शिवबा