धन्य ती जिजाऊ शिवजन्मदात्री

Submitted by आनंद गोवंडे on 9 November, 2010 - 04:05

जिने पाहीला सूर्य अंधार रात्री
धन्य ती जिजाऊ शिवजन्मदात्री

उन्मत्त यवनांचे इथे राज्य होते
धर्म-न्याय-निती इथे त्याज्य होते
मदाने तयांच्या गांजली धरित्री

साडेतीनशे वर्ष अंधार होता
क्रूर लांडग्यांचा मुक्त संचार होता
इतरांपरी जी थिजली ना गात्री

गांजल्या जिवांना जीने हात दिला
स्वराज्य-स्वधर्म नवा मंत्र दिला
स्वातंत्र्य घोष उठे मध्यरात्री

शहाजीस बंदी करी आदिलखान
चिंता परी ना झुकू देई मान
खानास मात - दिल्लीस मैत्री

अफजल गर्जे दिन दिन दिन...
तुळजा भवानीवरी घाली घण
फडील अफजल शिवबा ही खात्री

शिवबास जी राष्ट्रकार्यास धाडी
म्हणे - अफजुल्ल्यास संपूर्ण गाडी
नैवेद्य सजवीन रिपुमुंड पात्री

शिवबा पन्हाळ्यास वेढून पडला
जौहर-शास्ता गळ्यास भिडला
समशेर घेऊन निघे आदिशक्ती

दिल्लीकराने हाय घात केला
स्वराज्य लचका तोडून नेला
प्रलयांत धरी राज्यांस छत्री

राज्याभिषेक शिवबास झाला
स्वातंत्र्य सूर्य उदयास आला
साफल्य अश्रू दाटले मातॄ नेत्री

गुलमोहर: 

उन्मत्त यवनांचे इथे राज्य होते
धर्म-न्याय-निती इथे त्याज्य होते
मदाने तयांच्या गांजली धरित्री

हे तर छान लिहिलेस मित्रा !!

आवडली मनापासून !!