असे कसे हे शोषित पारतंत्र्यातील जगणे
बंधनाच्या कोंदट कारागृहात मनाला जखडून ठेवणे |
व्यक्त होऊ पाहणाऱ्या जाणिवांना थांबवणे
भावनांना आतल्या आत दाबून टाकत कुढत राहणे ||
सगळे साखळदंड तोडून टाकणार मी
कारागृहाच्या चौकटी फोडून टाकणार मी |
वायुप्रमाणे संचार करणार मी
अनंत ब्रह्मांडे पालथी घालणार मी ||
स्वातंत्र्याचे पंख लेवून स्वछंदपणे विहरायचंय
ह्या कोंडलेल्या श्वासांना मुक्त करायचंय |
स्पंदनांच्या जाणिवांना व्यक्त करायचंय
पिंजरा तोडून भरभरून जगायचंय||
जिने पाहीला सूर्य अंधार रात्री
धन्य ती जिजाऊ शिवजन्मदात्री
उन्मत्त यवनांचे इथे राज्य होते
धर्म-न्याय-निती इथे त्याज्य होते
मदाने तयांच्या गांजली धरित्री
साडेतीनशे वर्ष अंधार होता
क्रूर लांडग्यांचा मुक्त संचार होता
इतरांपरी जी थिजली ना गात्री
गांजल्या जिवांना जीने हात दिला
स्वराज्य-स्वधर्म नवा मंत्र दिला
स्वातंत्र्य घोष उठे मध्यरात्री
शहाजीस बंदी करी आदिलखान
चिंता परी ना झुकू देई मान
खानास मात - दिल्लीस मैत्री
अफजल गर्जे दिन दिन दिन...
तुळजा भवानीवरी घाली घण
फडील अफजल शिवबा ही खात्री
शिवबास जी राष्ट्रकार्यास धाडी
म्हणे - अफजुल्ल्यास संपूर्ण गाडी