फॉल कलर्स

फॉल कलर्स

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

रंगबावरी नक्षी.

Submitted by नंद्या on 9 November, 2010 - 03:14

सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने झाडांचे आणि आकाशातल्या पक्षांचे. झाडांचे रंग झरझर बदलत जातात. दक्षिणेकडे झुकणारा सूर्यप्रकाश काही सुंदर करामती दाखवतो. त्याचा झाडांवर जिथेजिथे स्पर्श होतो तिथे तिथे रंगांचे मोहोळ फुटते. ऑक्टोबरमध्ये ते जोरदार पेटते आणि नोव्हेंबरच्या सुमारास सुन्न झाडांच्या तुराट्या आणि त्यांच्या पायाशी, रस्त्यावरच्या गाड्यांमागे सैरावैरा धावणारी पोरकी पाने उरतात. या प्रवासात कधीकधी करड्या ढगांच्या फटीतून डोकावणारी सोनसळी संध्याकाळ भेटते. रंग बदलत गळणार्‍या पिवळ्या पानांच्या ढिगार्‍यांमध्ये एखादे लालपान खुणावत रहाते. तळ्याच्या काठी हे रंग, ही पाने वेगळीच नक्षी मांडतात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फॉल कलर्स