पणती

Submitted by रानभुली on 16 March, 2022 - 02:55

घन दाटुनि नाही आले झणी | सौदामिनी कुठुनी ये अंगणी || धृ ||

चिंब भिजली आठवगीते | नभ बरसती तुला बघुनी |
त्या मेघांतून वीज चमकता | माळ प्रभूची शब्द धरी || १ ||

त्या भेटींची चित्रे धूसर | सात पडद्यामागे विरली |
रानी नाही शालू हिरवा | धरा नेसली ऊन्हंकाहिली ||२||

दोन नयनी एकच दृष्टी |अता न होई गाठीभेटी |
दुरूनी सूर आरतीचे येता | खोल गर्भाशी घुमते घंटी ||३||

किणकिणते ध्वनी भरूनी आले | कलत्या साऊल्या पडल्या अंगणी |
मावळतीच्या तेजासंगे | पणती होई नभदामिनी || ४ ||

- रानभुली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!! खूप सुंदर.
>>>>>>मावळतीच्या तेजासंगे | पणती होई नभदामिनी || ४ ||
function at() { [native code] }इशय मस्त कल्पना. खूप अध्यात्मिक डूब असलेली.

छान

खूप सुंदर शब्दरचना...!
खूप दिवसांनी तुझं लेखन वाचायला मिळालं..
पुलेशु...!

सामो, मानवजी, देवभुबाबा, मृणाली, फिल्मी आपणा सर्वांचे कविता वाचून आवड कळवल्याबद्दल मनापासून आभार.

दत्तात्रेय साळुंके सर , तुमच्या कविता खूप सुंदर असतात. तुमचा हुरूप वाढवणारा प्रतिसाद मिळणे हे भाग्यच आहे.
रूपाली - मनापासून आभार. नेहमीच्या जगात गेलं की सुचत नाही खूप दिवस. इथे थोडं डोकावलं तरी प्रेरणा मिळते. Happy
सर्वांचे आभार.

छान.

छान.