चुन्नाड

केका

Submitted by चुन्नाड on 25 July, 2022 - 08:02

मोरोपतांनी रचलेल्या केकावली (उदा. "सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो") या १७ अक्षरी "पृथ्वी" वृत्तात रचल्या आहेत ज्यामुळे त्या एका विशिष्ट चालीत म्हणता येतात. तशाच काही केका रचण्याचा हा प्रयत्न :

असमाधानी मनाविषयी
---------------------------
जरी उलगडे विराट जग हे मना सारखे
तरी कधीतरी होऊन जावे जना पारखे

मित्र नसणाऱ्या व्यक्तींसाठी
------------------------------
सवंगडी सखा कुणी न समजे अजातमित्रा
कशी निपजते मनुष्यघाणी प्रजात, मित्रा

केका

Submitted by चुन्नाड on 22 June, 2022 - 10:38

मोरोपन्त यान्च्या केकावली प्रेरणा मानून काही केका रचल्या आहेत:

असमाधानी मनाविषयी
---------------------------
जरी उलगडे विराट जग हे मना सारखे
तरी कधीतरी होऊन जावे जना पारखे

मित्र नसणाऱ्या व्यक्तींसाठी
------------------------------
सवंगडी सखा कुणी न समजे अजातमित्रा
कशी निपजते मनुष्यघाणी प्रजात, मित्रा

विधवा मातेविषयी
---------------------
सपुत्र विधवा आई अन कधी पिता भूमिका
करू न शके एक बैल नांगर सकस भूमी का

विलक्षण

Submitted by चुन्नाड on 13 May, 2022 - 06:53

कधी अचानक मनात येते
एक पोकळी गूढ विलक्षण
काही केल्या करमत नाही
विचारमग्न प्रहरांचे क्षण

आठवणींच्या लाटा खुनशी
खरवडती मम चित्तकिनारे
बोलूनही सांगता न येते
बंद मनाची उघडी दारे

व्यक्त होऊ, बांध फोडू, पण
राहिला मागे जुना गावही
मनावरील खपली काढून
अकस्मात जागे जुना घावही

ⓒ चुन्नाड

Subscribe to RSS - चुन्नाड