विलक्षण

Submitted by चुन्नाड on 13 May, 2022 - 06:53

कधी अचानक मनात येते
एक पोकळी गूढ विलक्षण
काही केल्या करमत नाही
विचारमग्न प्रहरांचे क्षण

आठवणींच्या लाटा खुनशी
खरवडती मम चित्तकिनारे
बोलूनही सांगता न येते
बंद मनाची उघडी दारे

व्यक्त होऊ, बांध फोडू, पण
राहिला मागे जुना गावही
मनावरील खपली काढून
अकस्मात जागे जुना घावही

ⓒ चुन्नाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users