गोपीका

गॉळण

Submitted by बाला on 11 January, 2011 - 01:15

नको हरी मुरलि वाजवू बनात;
ध्यान लागत नाही माझ कामात ||
तुझ्या मुरलिचे ॑एकुन स्वर,
लागते जिवा माझ्या हुरहुर,
येऊ तिथे कशी सासू येई रागात
ध्यान लागत नाही माझ कामात ||
मुरलिचे सुर पडता कानी,
कान्हा मी होते दिवानी,
संशय घेई पती मनात,
ध्यान लागत नाही माझ कामात ||
ध्यानी मनि दिससी तुच गडे ,
अणु रेणु व्यापले चहूकडे
दीन दासी घे रे हदयात
ध्यान लागत नाही माझ कामात ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

Submitted by पाषाणभेद on 8 October, 2010 - 21:15

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

अरे कान्हा तू मजला असा छेडू नको
हात धरूनी वाट माझी तू अडवू नको ||धृ||

नेहमीची मी गवळणबाई, जाते आपल्या वाटंनं
डोक्यावरती ओझं आहे, लोणी आलंय दाटून
बाजारात मला जावूदे, वाट माझी अडवू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||१||

लांबून मी आले बाई, जायचे अजून कितीक लांब
चालून चालून थकून गेले, करू किती मी काम
इथे थांबले थोडा वेळ, दम माझा तोडू नको

गुलमोहर: 
Subscribe to RSS - गोपीका