तुमच्या स्पर्धेमध्ये माझा टिकाव नाही
लांगुलचालन करणे माझा स्वभाव नाही
स्वतःच घाला हार, तुरे घ्या, अन पैसेही
या सगळ्याचा मला जराही सराव नाही...
हवे तसे ठोकून द्या पुन्हा भाषण फक्कड
फसेन मीही असा आपला ठराव नाही !
वरदहस्त का त्याचा आम्हां सर्वांवरती समान नाही?
नशीब देऊ केले त्याने, मजला मंजूर दान नाही
निघून गेली तरूण वर्षे आयुष्याशी झुंजण्यामधे
नीरस वाटे दिवस आजचा, वणवा नाही, तुफान नाही
"उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?
तुझे नाम नाही असा श्वास नाही
तुम्हावीण स्वामी दुजा ध्यास नाही
असे केशरी दूध नी गोड पोळी
दिल्यावीण त्वा या मुखी घास नाही
नको वेदशास्त्रे, नको कर्मकांडे
नको ध्येय ज्याला तुझी कास नाही
अणू आणि रेणू तुवा व्यापलेला
प्रार्थना माझी कधीही, एव्हढी फळलीच नाही!
फाटले आभाळ इतके, झोपडी उरलीच नाही!
भेकडांच्या घोळक्याने,ओळखावे ना मलाही,
ज्यांस माझी झुंज कसली? का? कधी कळलीच नाही!
दुःख घ्यावे का कुणाचे? का व्यथेचीही उधारी?
ताणल्या तारांतही थरकाप नाही
ओळखीचा तो जुना आलाप नाही
मूक गुज तव आठवाशी नित्य काही
काय हरकत थेट वार्तालाप नाही?
वाटले मज सोडुनी जाता सयी त्या
विस्मरण तर देणगी, अभिशाप नाही!
स्तब्ध अवचित जाहले आभास सारे
ती केवळ सोबत होती , सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही
तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही
राखेत निखार्यासम मी, धग आहे अजून बाकी
कुणी कुरवाळले नाही, कुणी रागावले नाही
कधी अस्तित्वही माझे कुणाला बोचले नाही
दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?
वहीमध्ये कश्या दिसतात नोंदी फक्त पुण्याच्या?
थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही
काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही
काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?
बुजलेल्या वाटांचा काही गाव शोधणे नाही
दूर निळ्या मेघांची आता वाट पाहणे नाही
आसुसलेली हुरहुरणारी रात जागणे नाही
अता व्यथा माझी मजपाशी मौन तोडणे नाही
कसे पटावे जनरितीला नाते तुझे नी माझे