प्रवेशिका - ३२ ( upas - तुझे नाम नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 9 October, 2008 - 23:47


तुझे नाम नाही असा श्वास नाही
तुम्हावीण स्वामी दुजा ध्यास नाही

असे केशरी दूध नी गोड पोळी
दिल्यावीण त्वा या मुखी घास नाही

नको वेदशास्त्रे, नको कर्मकांडे
नको ध्येय ज्याला तुझी कास नाही

अणू आणि रेणू तुवा व्यापलेला
न ब्रह्मांड जेथे तुझा वास नाही

तुझ्या पादुकांच्या वरी डोइ माझी
कुठे पाप ज्याला तिथे नास नाही

तुझा हात पाठी भिऊ मी कुणाला
भवाच्या भयाचा मला त्रास नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! आवडली!

पण, तुझे कास का तुझी कास? आणि डोई चा ई दीर्घ ना?
नास - नाश का?

बहुतेक हा नासधुस मधील नास असेल.

छान आहे गजल. भक्तिभाव छान उतरला आहे. माझे ९ गुण.

माझे ५. समर्थाचीया सेवका !!

भक्तीमय गझल!!!

७ गुण..

भक्ति गझल! Happy
आवडली.
७ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

खूप छान ! भक्ती हा पण गझलचा विषय असू शकतो हे पाहून बरे वाटले. साधारण अंदाज येतोय हि गझल कुणाची असावी त्याचा Wink

माझे ६ गुण

छान...
माझे गुण ५

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

भक्तीमय गजल. सोपे प्रवाही शब्द. नास म्हणजे? श्री स्वामी समर्थ.
माझे १० गुण

हास्य गझल जर हझल तर भक्ती गझल ही भझल होईल का?

माझे ४ गुण

मीनाताई Happy
माझे ५
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

वेगळ्या विषयावरील गझल.
प्रयत्न स्तुत्य आहे.

माझे ५ गुण

वा फारच सु॑दर भक्तिमय गझल
१०

वेगळा विषय.
माझे ५ गुण.

उपास, मी ओळखलं होतं की ही तुझीच गजल आहे Happy अरे मी सासरी जाताना माझ्या बॅग मधून स्वामींचा फोटो घेऊन गेले होते. तू त्या गणपतीच्या वेळी लिहिले होतेस ना "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" !!

अश्विनी Happy
त्यावेळी जे मनात होतं ते शब्दबंबाळ न होऊ देता सोप्या आणि मोजक्या शब्दात बाधायचा प्रयत्न केला इतकच. खर तर माझ्याही वाचनात कधी भक्तिमय गझल आलेली नाही आजपर्यंत, पण वेगळा प्रयत्न करावा असं मनात आलं. ही तांत्रिकदृष्ट्या गझल असली तरी ओवी किंवा श्लोकाच्या जवळ जातेय असं वाटतं.. पण हे जे काही आहे त्यावर मी समाधानी आहेच (ते महत्त्वाचं :)), वेळेअभावी अजून एखादी गझल देता आली नाही कार्यशाळेत..
हा गझलेतला शेवटचा शेर जो अप्रकाशित ठेवला होता नाव कळू नये म्हणून --

गुरु मार्ग दावी घडे मोक्षप्राप्ती
प्रशांताप्रमाणे दुजा दास नाही ||

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.