मायबोली गणेशोत्सव २०२१

खास लोकाग्रहास्तव गणेशोत्सवातल्या सगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे.

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 20:32

खास लोकाग्रहास्तव गणेशोत्सवातल्या सगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे.
सगळ्या स्पर्धांची यादी इथे पाहता येईल.

विषय: 

शशक पूर्ण करा - 'लँडिंग' - मी अश्विनी

Submitted by मी अश्विनी on 12 September, 2021 - 09:26

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....बझ४२ धावत कॉकपिट मध्ये येतो....

नील४२, युरोपा४२ कसबसं क्रॅशलँडिंग झालं पण पावरसोर्स डेड, ऑक्सिजन कंटेनर लीकेज.
कसा पाय ठेवणार आपण युरोपावर? आणि परतीचा प्रवास?

डोंट पॅनिक बझ४२! ह्युस्टन?

संपर्कयंत्रणासुद्धा निकामी.
पण क्रायोस्लीप चेंबर ईन्टॅक्ट आहे. अठरा वर्षानंतर युरोपा४३ येईल तोवर क्रायोचेंबर आपल्याला जगवेल.

विषय: 

शशक पूर्ण करा-हल्लीची मुलं-मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 10 September, 2021 - 05:15

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

“अग गधडे, दार उघडायला एवढा वेळ? अशी अवेळी झोपली होतीस की काय? दिवेलागणीची वेळ झाली की.”

असं बडबडत आईने पटापटा सगळे दिवे लावले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला. बाहेरील आणि मनातील अंधार निघून गेला.

पण पाण्याचा आवाज…?तो अजून येतोच आहे.
कधी टपटप…कधी धोधो..
हा त्याच्यासोबत धुंद करणारा धो धो पाऊस ..

का ?

पावसात आसर्याला जोडीने थांबल्यावर अंगावर पडणार्या पागोळ्या…
मनात परत हुरहूर दाटून आली..

विषय: 

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १ - हास्य

Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:52

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे

हास्य

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव  २०२१