शशक पूर्ण करा - 'लँडिंग' - मी अश्विनी

Submitted by मी अश्विनी on 12 September, 2021 - 09:26

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....बझ४२ धावत कॉकपिट मध्ये येतो....

नील४२, युरोपा४२ कसबसं क्रॅशलँडिंग झालं पण पावरसोर्स डेड, ऑक्सिजन कंटेनर लीकेज.
कसा पाय ठेवणार आपण युरोपावर? आणि परतीचा प्रवास?

डोंट पॅनिक बझ४२! ह्युस्टन?

संपर्कयंत्रणासुद्धा निकामी.
पण क्रायोस्लीप चेंबर ईन्टॅक्ट आहे. अठरा वर्षानंतर युरोपा४३ येईल तोवर क्रायोचेंबर आपल्याला जगवेल.

माय ओल्ड फ्रेंड बझ४२, अरे आपल्या जीन्स मध्ये फक्त पाऊल पुढे टाकणे लिहिले आहे. चंद्रावरती नील०० काय म्हणाला होता विसरलास?... “One small step for man. One giant leap for mankind.”
...आणि तुला खळाळत्या पाण्याचा आवाज येतोय ना?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो,
नासाने चंद्रावर पहिल्याने पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिनचे क्लोन्स बनवले आहेत. हे दोघांच्या क्लोन्सचे ४२वे वर्जन आहे.
ही जोडी गुरू ग्रहाच्या चंद्रावर म्हणजे युरोपावर पहिल्याने लँड करत आहे पण दुर्दैवाने त्यांचे क्रॅशलँडिंग झाले आणि यानावरची लाईफ सपोर्टिंग सिस्टीम पूर्ण डॅमेज झाली आहे. ह्युस्टन म्हणजे नासाशी सुद्धा त्यांचा संपर्क होत नाहीये. आता ते युरोपावर फार काळ जिवंतही राहू शकत नाही की पुन्हा पृथ्वीवरही जाऊ शकत नाही.
पण यानातली क्रायोस्लीप चेंबर (अशी खोली जिथे नील आणि बझ अनेक वर्षांसाठी चिरनिद्रेत जाऊन जिवंत राहू शकतात) सुस्थितीत आहे.
तर बझ सुचवतो की अठरा वर्षानंतर पुढचे यान युरोपावर येणार आहे तोवर आपण चिरनिद्रेत जाऊ.
त्यावर नील म्हणतो की आपल्या जीन्समध्ये (ते चंद्रावर पाय ठेवणार्‍या नील आणि बझचे क्लोन असल्याने) अशी माघार घेणे नाही तर फक्त पाऊल पुढे टाकणे लिहिले आहे. त्यासाठी तो बझला नील आर्मस्ट्राँगच्या चंद्रावर पाऊल ठेवतांनाच्या फेमस शब्दांची आठवण करून देतो.

आणि वाहत्या पाण्याचा आवाज येत आहे म्हणजे युरोपावर जीवसृष्टीसाठी जगण्यालायक वातावरण असू शकते ही एक आशा.

पाऊल पुढे/ पाणी/ जीवसृष्टी भाग समजलेला पण युरोपा आणि ह्युस्टन कनेक्शन तुम्ही लिहिल्यावर लक्षात आलं.
आवडली.

छान. एकदम वेळगी कल्पना.