......घाबरुन अर्धवट फुटलेली कवटी उचलून.........

ताई (भाग ४था )

Submitted by मिरिंडा on 2 July, 2020 - 06:01

.......घाबरून मी अर्धवट फुटलेली कवटी उचलून प्रथम वार्ड रोबच्या खणात टाकली. तिचा भुसा कसातरी गोळा करून वार्डरोबच्या बाजूच्या खणात फेकला. दरवाज्या उघडला दारात ताई उभ्या‍ . मी पटकन टाईम पाहिला साडेदहा होत होते. आत येत ताई म्हणाल्या , " टाईम बघू नका. दीपा आत्ताच झोपायला गेल्ये." ताई आता साडीमध्ये होत्या. त्या आत शिरल्या. एकूणच सर्व वातावरण पाहून म्हणाल्या, " काय शोधाशोध चालल्ये . तुम्हा पीएचडी वाल्यांची नजर सारखी काही ना काही तरी शोधत असते. " असं म्हणून त्यांनी दरवाज्या लावला. माझी छाती धडकली. आता ही बाई काय करते असा भाव माझ्या तोंडावर असावा .

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - ......घाबरुन अर्धवट फुटलेली कवटी उचलून.........