ताई (भाग ४था )

Submitted by मिरिंडा on 2 July, 2020 - 06:01

.......घाबरून मी अर्धवट फुटलेली कवटी उचलून प्रथम वार्ड रोबच्या खणात टाकली. तिचा भुसा कसातरी गोळा करून वार्डरोबच्या बाजूच्या खणात फेकला. दरवाज्या उघडला दारात ताई उभ्या‍ . मी पटकन टाईम पाहिला साडेदहा होत होते. आत येत ताई म्हणाल्या , " टाईम बघू नका. दीपा आत्ताच झोपायला गेल्ये." ताई आता साडीमध्ये होत्या. त्या आत शिरल्या. एकूणच सर्व वातावरण पाहून म्हणाल्या, " काय शोधाशोध चालल्ये . तुम्हा पीएचडी वाल्यांची नजर सारखी काही ना काही तरी शोधत असते. " असं म्हणून त्यांनी दरवाज्या लावला. माझी छाती धडकली. आता ही बाई काय करते असा भाव माझ्या तोंडावर असावा . हे ओळखून त्या म्हणाल्या, " अहो मी काही तुम्हाला खात नाही " त्यावर मी बेड्वर बैठक मारली. त्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या. अचानक त्या टेबलाकडे वळल्या. मग माझ्याकडे पाठ वळवून म्हणाल्या, " तुम्हाला एक गोष्ट विचारू का ......? " प्रश्न अर्धवट सोडून माझ्याकडे पाहू लागल्या. हुं. बोला असे म्हणून त्या काय विचारतात या भीतीने त्यांच्याकडे पाहात राहिलो. पण त्या बोलेनात. मग मी त्यांच्याकडे आलो आणि म्ह्णालो, ..... " काय विचायचंय विचार ना गायत्री , " मी मुद्दामच एकेरी उल्लेख केला. तिने खालच्या मानेनेच विचारले, " तुम्ही आता लग्न करणार असालच नाही का ? घाबरू नका मी दीपाला सिनेमा बद्दल काहीच सागितलं नाही...... मग काय ठरलंय तुमचं. " असं म्हणत त्या जवळ आल्या. स्वतःच्या सेंटचा वास मला जाणवेल असं पाहात त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवीत त्यांचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. आता त्या किस करण्याच्या अतरावर होत्या. पण मी स्वतःला सावरलं. आणि बाजूला झालो. त्यांच्या डोळ्यात निराशा आणि रागही डोकावला. त्या ज्या ज्या वेळेल खूण करतील तेव्हा तेव्हा मी बळी पडलं पाहिजे असं त्याना वाटत असावं. मग थोड्या लांब गेल्या आणि पाठमोऱ्या वळत दरवाज्या कडे वळल्या. मला वाटलं माझी सुटका झाली. आत्ता मला दीपा पाहिजे होती. आम्ही दोघेही आठवडाभर दूर होतो.. पण माझा अंदाज चुकला. त्या पाठमोऱ्या अवस्थेत ब्लाऊज काढू लागल्या. मला समजेना. त्या पुढे काय करण्याच्या विचारात आहेत या आश्चर्यात असताना त्यांनी ब्लाऊज पूर्ण काढला होता. पदर अजून तसाच होता. आता त्या ब्रेसियरचे हूक काढू लागल्या. ब्रेसियर आणि ब्लाऊज काढून खाली ठेवीत त्यांनी पदरही काढला. मी उत्तेजित झालो. त्याना कधी एकदा कवेत घेतोय असे वाटून मी माझे दोन्ही हात उचलून त्यांच्याकडे पाऊल टाकलं. बरोबर त्याचवेळी त्या माझ्याकडे वळल्या. डाव्या हातातल्या मोबाइलचा टौर्च त्यांनी स्वतःच्या घाटदार छाती कडे वळवला. पदराखाली झांकलेली त्यांची ताठर काळी निपल्स दिसत होती.. आता त्यांनी हळू हळू पदर बाजूला करायला सुरुवात केली. खोलितला उजेड तसा मंदच होता. त्यांची घट्ट छाती आता पूर्ण पणे उघडी झाली. मी मॅडसारखा छातीकडे पाहत असताना त्यांनी दोन्ही स्तनांमधला भाग उघडला आणि म्हणाल्या, " तुम्ही यू रिअली लव्ह मी म्हणाला होतात ना ? " आणि त्यात असलेल्या चार पाच कोडाच्या तेजाने चमकणाऱ्या डागांकडे पाहून म्हणाल्या, " माझ्याशी लग्न कराल ? ...... " मला ते पाहून चांगलाच धक्का बसला होता.
माझा स्तंभित झालेला चेहरा पाहून त्यांना आणि मला एकाच वेळी कळून चुकलं की माझी विकेट गेलेली आहे. ......आपली छाती तशीच उघडी ठेवीत एकेक पाऊल माझ्याकडे टाकीत त्या म्हणाल्या, " बघा , आत्ता जर तुम्ही दीपाला सोडलीत तर निदान तीन चार वर्ष तरी तिच लग्न होणं शक्य नाही. म्हणजे ती फ्रस्ट्रेट होणार. विचार करा . मी तर लग्नाची बायको असेनच पण ती पण तुमच्या सोबत असेल. म्हणजे समजतंय ना ..... एकाच दगडात दोन पक्षी . ........ " आता त्या जवळ येत चालल्या होत्या. त्यांच्या घाटदार छातीवरचे काळेभोर निपल्स आता ताठ होऊ लागले होते. आता त्या माझ्यापासून हाताच्या अंतरावर होत्या. त्या काय म्हणत होत्या ते माझ्या आस्ते आस्ते लक्षात आलं. मला प्रथम चीड आली. मग राग आणि एखाद दोन कानफटात मारण्याची इच्छा झाली.. माझा हात उठणार एवढ्यात त्या म्हणाल्या , " म्हणजे आजकालच्या भाषेत , बाय वन गेट वन फ्री. " ... आणि त्या हासत सुटलया . माझा हात तत्क्षणीच उठला आणि त्यांच्या गालावर जाऊन फाटकन पडला. मला वाटलं अपमान आणि राग यांनी त्या मागे सरकतील. पण तसं न होता त्यांनी मला घट्ट मिठी मारून माझं चुंबन घेण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या. मला मागे सारकवीत त्यांनी मला बेडबर उताणे पाडले आणि उघड्या छातीनेच त्या माझ्या अंगावर चढल्या. आणि हसू लागल्या. मला त्यांची किळस येऊ लागली. आपल्या बहिणीबद्दल अस खालच्या पातळीचं विधान करणारी ती स्त्री मला आवडेनाशी झाली. मग त्या हिडिसपण हासू लागल्या. त्या बरोबर त्यांचे थोडे लांबट आणि चमकणारे सुळे मला दिसले. मी घाबरून मागे सरकलो. अचानक त्यांच्या अंगात पाशवी बळ संचारलं.त्यांच्या ओठांच्या कोपऱ्यात लाळ जमा झालेली दिसली. मला अत्यंत घ्रुणा आली. मी जिवानिशी जोर लावून त्याना मागे ढकलल्या. चपळाईने उठलो आणि दरवाज्या उघडला. बाहेर येऊन मी दीपाच्या दरवाज्यावर थापा मारू लागलो. ताई आत नक्की काय करीत होत्या ते समजत नव्हते.. आता दीपाने दरवाज्या उघडण्याची गरज होती पण ती झोपेत असावी. मी आता वेड्यासारखा दरवाज्या ठोकीत होतो. दीपाला कसली एवढी झोप लागली होती , कोण जाणे. फाटकन दरवाज्या उघडला. आणि ताई बाहेर पडल्या. मी येताना दरवाज्या बाहेरून लावून घेताला असता तर बरं झालं असतं असं वाटू लागलं. ताईंनी आता कपडे नीट घातले होते. पण त्यांच्या एका हातात सुरा होता. आणि त्या विकट हास्य करीत माझ्याकडे येऊ लागल्या. अजून दीपानी दरवाज्या उघडला नव्हता. ताईंच्या ओठाच्या कोपऱ्यातून लाळ गळत असलेली दिसली. जणू एखादा पिसाळलेला कुत्राच . त्या जवळ आल्या आणि सुरा असलेला हात वर करून माझ्यावर उगारला. मी चपळाईने त्यांचा हात घट्ट पकडून सुरा काढून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. अजूनही दीपाने दरवाज्या उघडला नव्हता. तेवड्यात मला ढकलीत ताई भिंतीच्या दुसऱ्या टोकाला आल्या . आणि तिथे त्यानी वरच्या कोनाड्यात हात घालून तो तेथील कळ दाबली असावी खडर्र र्र ..... असा आवाज करीत भिंतीतला एक दरवाज्या उघडला आणि मी कोणत्यातरी मार्गामध्ये पडलो. ताईंनी त्या बोळकंडीतला लाईट लावला. आणी मला ढकलून आत सरकवण्याचा पयत्न करू लागल्या. मागून अचानक पप्पांचा आवाज आला , " गायत्री सोड त्याना. .... " पण गायत्री ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हती. पप्पांच्या मऊ बोलण्याचा ताईंवर काहीही परिणाम झाला नाही. पप्पांनी ताईंची सत्ता फार वर्षांपूर्वीच मानलेली होती. आता विरोधाचा काही उपयोग होणार नव्हता. अचानक दीपाने दरवाज्या उघडला. ती ओरडली, " ताई सोड त्याला..... " आणि तिच्या हातातला सुरा काढण्याचा पयत्न करू लागली. ताईंचं लक्ष विचलित झालेलं पाहून मी त्यांना जोरात धक्का दिला आणि त्या बोळकंडी बाहेर पडल्या. मी चपळाईने उठून त्या बोळकंडी बाहेर आलो.. आता पुन्हा मागे लागल्या. मी पटकन दीपाच्या खोलीत शिरून दार लावून घेतले.......
मी दार लावून घेतलं. पण ताई जोरजोरात दार ठोकत राहिल्या . तोंडाने , "ए चल बाहेर ये..... मला तू हवायस, मी तुला सोडणार नाही. ...." असं म्हणून आता त्या दरवाज्यावर धडका मारू लागल्या. अधून मधून दीपा तिला ओढीत होती. पप्पाही तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. तेवढ्यात ताईंचा घोगरट आवाज आला. " डॉ. तिडबिडेंना बोलवा. याला मी असा सोडणार नाही .... मला चँलेंज करतो. याला शिक्षा झालीच पाहिजे. ...." पप्पा आणि दीपा तिला तिच्या खोलीत ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. एकदा कोंडून ठेवली की बरं. त्या दोघांना ती आवरत नव्हती. दीपाने कसातरी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. ताईंच्या तोंडातून आता पिसाळलेल्या जनावरासारखा आवाज येत होता. आता त्या दोघानी मिळून ताईला ढकलीत खोलीच्या दरवाजाजवळ आणलं. तेवढ्यात ताईंंनी पप्पांच्या कानफटात मारली, आणि दीपाला बाजूला ढकललं. आणी त्या जिन्याकडे पळाल्या. आता मात्र पप्पानी धावत जाऊन ताईंचे केस पकडले आणि फटाफट दोनतीन कानफटात मारल्या. त्यावर दीपा ओरडून म्हणाली, " पप्पा ,मारु नका तिला. ती जास्त चेकाळेल. " पण पप्पांमधला पुरुष जागा झाला होता . त्यांनी केसांनी ओढत तिला तिच्या खोलीजवळ आणलं. मग दीपाच्या मदतीने त्यानी आत ढकलली..तिला लाथेने उडवली. मग पटकन दरवाजा लावून घेतला आणि एकदाची बाहेरुन कडी लावून घेतली. पप्पा आणि दीपाला एवढा दम लागला की जणू काही ते काही मैल धावून आल्येत असं वाटावं. मग त्यानी मला बाहेर यायला सांगितलं. बाहेर आल्या आल्या मी आत्ताच्या आत्ता निघण्याचं जाहीर केलं त्यावर पप्पा म्हणाले , " अहो, आजची रात्र राहा निदान थोडी विश्रांती तरी मिळेल. नाहीतरी तुम्ही या सगळ्या प्रकारान तुम्ही चांगलेच थकला असाल..ऐका माझं." ..... पण कोणताही चान्स घ्यायला तयार नव्हतो. " पाहिजे तर तुम्ही दोघे येऊ नका. मी पोहोचल्यावर सकाळी ड्रायव्हरसहीत गाडी पाठवीन. काळजी करु नका तो तुम्हाला घरी नक्कीच सोडेल. " आता मात्र न राहवून दीपा म्हणाली, " अरे, आता ताईला बंद करुन ठेवल्ये. थांब की रे माझ्यासाठी आणि पप्पांसाठी तरी. " .... आता मात्र मी म्हंटलं ," नाही नाही , सकाळी उठून ताईलाही घेऊन जाण्याचं ठरवलंत तर ,.? मी ताईच्याबाबतीत कोणताही धोका पत्करायला तयार नाही.. मग थोडावेळ जाऊन देऊन पप्पा म्हणाले, माझं ऐकाच. रात्री बेरात्री ड्रायव्हिंग करु नका ,सकाळीच नाश्ता करुन आपण निघू. मी वचन देतो. " , खरंतर मला पप्पांचा खूप राग आला होता . ते ताईचा गुलाम असल्यासारखे वागत आले होते. पण मी राहण्याचं, ताईना बरोबर न घेण्याच्या अटीवर मान्य केले.
..मी माझ्या खोलीत जाऊन दरवाज्या लावून घेतला . बरं झालं दीपा माझ्या खोलीत नव्हती ते . ते बरं ही दिसलं नसतं. मला झोप लागेना. जवळजवळ एक वाजत होता. काहीतरी करायचं म्हणून मी खिडकी उघडली. बाहेर मिट्ट अंधार होता. अंधाराच्या पार्श्वभूमीवर त्यापेक्षा गडद्द काळ्या हालणाऱ्या व्रुक्षांच्या कडा दिसत होत्या . फक्त रातकिड्यांची किरकिर मात्र जवळून ऐकू येत्ये असं वाटत होतं. मी मोबाईलचा टॉर्च चालू केला. समोरच्या काळोखाला चिरत जाणारी प्रकाशाची तिरीम लवकरच थांबल्यासारखी वाटली. पाऊस कंटाळल्यासारखा रिपरिपत होता. टॉर्च म्हणजे अंधारावर मारलेली क्षीण अशी धूसर रेषाआणि तिच्यावर हसणारा विकराल अंधार. मला तर वाटलं, असंच दरवाज्या उघडून बाहेर पडावं ,आणि कोणालाही न सांगता चुपचाप गाडी काढून निघावं. खड्ड्यात गेली ती ताई आणि तिच्यापुढे शेपूट हलवणारे पप्पा. .
(क्रमश:)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

मागच्या भागात आलेल्या कवटीच्या उल्लेखामुळे कथा असे वळण घेईल असे वाटले होते.. मस्त झाला आहे हा भाग.. पुढचा भाग लवकर टाका.. प्रतिक्षेत..

नमस्कार
तुम्ही कसे आहात ?
तुमची नविन कथा खूप छान आहे.त्या नवीन कथे साठी तुम्हांस खूप खूप शभेच्छा
सर ,तुमच्या दोन तीन कथा अपूर्ण आहेत ,त्या पूर्ण कराव्यात हिच माझी अपेक्षा आहे.

चारही भाग वाचले. मनोरुग्ण असावी ताई.. संधीसाधू कथा नायकाची फ झाली या भागात. पुढच्या कथेची उत्सुकता आहे.