चा चा चो !

Submitted by साद on 1 November, 2019 - 00:31

मराठी आंतरजाल सुरु होऊन आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटलाय. अनेकविध विषयांवर त्यावर आपण चर्चा, वादविवाद करतो. त्यातले काही विषय बरेच वादग्रस्त असतात आणि त्यामुळे सतत चर्चेत येतात. त्यातल्या काहींचा तर चावून चावून चोथा (चा चा चो ) झालेला असतो. त्या विषयांच्या वारंवार चर्चेतून एक लक्षात येते ते असे. अशा विषयाच्या दोन्ही बाजूस भक्कम असे मुद्दे असतात. आपण सगळे प्रौढ असल्याने त्यातल्या कुठल्यातरी बाजूवर ठाम असतो. इथल्या चर्चेतून त्यावर काही परिणाम होत नसतो (काही अपवाद सोडून देऊ वरवर आपण कधी म्हणतो की मला त्या विषयाची दुसरी बाजू समजली. पण सहसा आपले मतपरिवर्तन होत नाही. तरीसुद्धा असे विषय जालावर अधूनमधून चर्चेसाठी येत राहतात. काही समतोल चर्चा छान रंगतात तर काही शा‍ब्दिक चकमकीपर्यंत जातात.

सहज गंमत म्हणून मनात असा विचार आला की अशा ‘चाचाचो’ विषयांची एक यादी सादर करावी. मला आठवलेले विषय खाली देत आहे. आपणही त्यात भर घालावी.

1. आस्तिकता / नास्तिकता
2. कर्मकांडे हवीत/ नकोत
3. शुभाशुभ असते / नसते
4. शालेय शिक्षण मराठीत/ इंग्लिशमध्ये
5. शुद्धलेखन महत्वाचे /नाही
6. आधुनिक वैद्यकशास्त्र / इतर उपचारपद्धती
7. लग्न करणे / निव्वळ सहजीवन/ एकटे राहणे
8. कुटुंबनियोजन सक्ती / नको
9. भारतात स्थायिक / श्रीमंत विदेशात

10. मतदान सक्ती असावी /नसावी
11. उत्सवातील गोंगाट चालेल / अजिबात नको
12. फटाके हवेत / नकोत
13. दुचाकीवर हेल्मेट सक्ती / नको
14. पर्यावरण / विकास
15. मुक्त लोकशाही / मर्यादित लोकशाही

तर असे आहेत हे काही चाचाचो विषय. बघा तुम्हाला अजून काही सुचतात का !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भक्त विरुद्ध पुरोगामीच्या त्सुनामीत वरचे सगळे विषय वळचणीला पडलेले आहेत. कधीतरी रुचिपालट म्हणून त्यातला एखादा विषय बडीशोपेसारखा चघळला जातो इतकेच. ती चिमूटभर बडीशोप संपली की परत भक्त विरुद्ध पुरोगामी सामना रंगतो.

शाकाहार / मांसाहार
आरक्षण
लव्ह मॅरेज / अरेंज मॅरेज
जातीय / आंतरजातीय लग्न

धन्यवाद.
येउद्यात अजून.
.. शाळेत लैंगिक शिक्षण द्यावे / नाही


Lol सिर्फ नाम ही काफी है

याच प्रकारात अतिरेकी(किंवा अजून योग्य नाव सुचवा) विनोद मोडतात, जे चा चा चो ची पुढची पायरी असतात.

नवरा बायको विनोद: यात बायको मूर्ख, दुष्ट, कामचुकार असते, नवरा गरीब बिचारा भांडी घासणे, धुणी धुणे, घर साफ करणे, बायकोच्या पाठोपाठ गुलामा सारखे फिरणे या गुणांच्या कांगाव्या व्यतिरिक्त वरून पापभिरू सुद्धा असतो.

दारूचे विनोद: यात दारूचे उदात्तीकरण नाही, पुनरुक्ती तर अजिबातच नाही, किती नाविन्यपूर्ण विनोद आहे,
पहिल्यांदाच ऐकला, अशा प्रतिक्रिया देणे अनिवार्य आहे असा अलिखीत नियम असतो.

स्थळ अर्थातच विनोद: यात विनोद असलाच पाहिजे याची आवश्यकता नसते. स्थळ अर्थातच असे लिहिले की मोठा विनोद घडतो.

दारू प्यावी/पिऊ नये,
दारू चांगली/वाईट.
नवीन Submitted by सिम्बा on 1 November, 2019 - 13:54

>>>>>

मुळात यात दोन बाजू नाहीयेतच.
दारू वाईटच असते आणि ती पिणे योग्य नसतेच.

फक्त हे मान्य होत नाही त्यामुळे वादासाठी नाही तर समाजप्रबोधनासाठी आणि नवीन पिढीला वेळोवेळी सावध करण्यासाठी हा विषय नेहमी नेहमी आणि नेहमी सतत अधूनम्धून हवाच !

मानव + १
त्यात थोडी भर म्हणजे सरदारजींचे विनोद.

ज्योतिष (खरं की बकवास?)
शाहरुख खान (आवडतो की नाही?)
पर्यावरण ऱ्हास विरुद्ध विकास
स्त्रियांचे कपडे (याने फरक पडावा/पडतो की नाही?)
हिंदू सण साजरा करण्याच्या पद्धती (सुधारणा गरजेच्या की नाही?)

शाहरुख खान (आवडतो की नाही?)
>>>

+७८६
शाहरूख आणि नरेंद्र मोदी
यू कॅन हेट लव बट कान्ट इग्नोर पर्सनॅलिटी आहेत.

उपवास करणे / गरज नाही
उपवासाला चालणारे / न चालणारे पदार्थ
दिवसात दोनदाच जेवणे / दर ३ तासांनी खात राहणे.

कॉलेजला असताना ऑर्कुट समूहांवरचे विषय

लव्ह म्यारेज, लिव्ह ईन रिलेशनशिप
गांधी सावरकर गोडसे
वृद्धाश्रम काळाची गरज
मंदिर वही बनायेंगे
पाकिस्तान्शी क्रिरकेट खेळावे का?
तुम्ही मुलीला प्रपोज कसे करता?
लव्ह जिहाद
तुमचा आवडता डिपी कोणता आणि का?
सचिनने निवृत्त व्हावे का?
संभाजी ब्रिगेड
गुढी उभारावी की नाही?
मुलाचे नाव सुचवा - अक्षर त ठ ड ढ ण
लग्नाआधी पत्रिका पाहावी का?
सत्यनारायणाची पूजा आणि भटजींची कमाई
नागबली नारायण
सचिनला भारतरत्न द्यावा का?
लता मंगेशकर यांचा काढून घेण्यात यावा का?
ताजमहाल हे शिवमंदीर होते का?
आणि शाहरूख खान देशद्रोही आहे का?

धनुडी दचकलात का?
तेव्हाचा हा हिट विषय होता.
अगदी २०१४ ला सुद्धा मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडेन हे फेक ट्वीट फिरत होते.

भाषावार प्रांतरचना निर्णय योग्य / अयोग्य
हिंदी राष्ट्रभाषा / नाही
सरकारी उद्योग:खाजगीकरण / नकोच
जागतिकीकरण चांगले / वाईट.