मुन्सियारी

भाग ५(अंतिम): कौसानी ते काठगोदाम

Submitted by मंजूताई on 23 August, 2019 - 05:36

सकाळी तरी पंचचूलीचं दर्शन होण्याची शक्यता नसल्याचे TRH कर्मचाऱ्याला बोलून दाखवलं तसं तो म्हणाला की " ऐसे हो नही सकता..... पंचचूली कभी किसीको निराश नही करता" त्याची वाणी खरी ठरली होती. बादल हट गये थे! निरभ्र आकाश! फोटोग्राफी करायला हेलिपॅड ग्राऊंडवर गेलो. तिथल्या गार्डने एका अटीवर आत प्रवेश दिला. ITBP कर्मचाऱ्यांनी नंदादेवी ट्रेकला गेलेल्या चार ट्रेकर्सचे मृतदेह शोधून काढले होते व ते त्यांना इथे घेऊन येणार होते. ते येण्याची सूचना मिळाली तर मात्र लगेच बाहेर जावं लागणार होतं. मनसोक्त पंचचूली डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवून घेतली. ट्रीप सफल झाल्याच्या आनंदात निद्राधीन झालो.

विषय: 
शब्दखुणा: 

भाग ३: चौकोरी ते मुन्सियारी

Submitted by मंजूताई on 20 August, 2019 - 05:34

चौकोरीला आरक्षित काॅटेज उतारावर होतं. तिथून हिमायलाचा व्ह्यू मिळणार नसल्याचं तिथला अनुभव घेऊन आलेल्या भाच्याने सांगितलं होतं. बदलून एक्झिक्युटीव रूम मिळेल का ? फोनवर चौकशी केली असता अधिकारी म्हणाला की, "म्याडमजी, चान्स की बात है! उस दिन खाली होगा तो मिल जायेगा लेकिन पैसा वापस नही मिलेगा ना ही खानेमें एडजष्ट होगा." ऑफ सिजन असल्याने दुसऱ्या मजल्यावरची मोक्याची रूम मिळाल्याने आनंदच झाला पण वाईट ह्याचं वाटत होतं की अक्कलखातं वयाबरोबर वाढतच जात होतं कमी होण्याच्या ऐवजी! साधंसंच जेवून निद्राधीन झालो.

विषय: 

भाग २: भीमताल ते चौकोरी

Submitted by मंजूताई on 18 August, 2019 - 06:24

भाग २ - भीमताल ते चौकोरी

पहिला स्टाॅप होता तो भीमताल!

वनवासाच्या दरम्यान द्रौपदी तहानेने व्याकुळ झाली होती. भीमाने गदा मारून ज्या ठिकाणी पाणी काढलं तो हा तलाव म्हणजे भीमतालेश्वर! टीक मार्क करत पुढे निघालो.

IMG-20190815-WA0022.jpeg

दुसराही स्पाॅट होता तो ही टीक मार्कवालाच. नौकुचिया ताल म्हणजे नऊ कोन असलेला तलाव. तलावाला प्रदक्षिणा मारत पुढे निघालो.

भाग १ : जाना था जोशीमठ - औली पहुंच गए.......

Submitted by मंजूताई on 17 August, 2019 - 00:35

झालं असं की, या वर्षी लेक भारतात आल्यावर कुठेतरी जाऊ असं चाललं होतं, पण नक्की कुठे ते ठरत नव्हतं. जायला जमणार होतं तेवीस जून नंतरच. खूप धावपळ करायची नव्हती. चार दिवस एका ठिकाणी निवांत राहायचं होतं.

Subscribe to RSS - मुन्सियारी