असेही एकदा व्हावे..
Submitted by मन्या ऽ on 6 August, 2019 - 18:37
असेही एकदा व्हावे..
असेही एकदा व्हावे
स्वप्नांना एक
मुक्त आभाळ मिळावे
असेही एकदा व्हावे
इच्छां-आकांक्षाना
महत्वाकांक्षी होण्याचे बळ मिळावे
असेही एकदा व्हावे माणसांच्या मनातले
गुज न सांगता कळावे
असेही एकदा व्हावे
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे
असेही एकदा व्हावे
सुखाने दुखाःस
आपले जिवलग मानावे
असेही एकदा व्हावे
दुसर्यासाठी जगणे
हे जीवनाचे ध्यास बनावे
असेही एकदा व्हावे
जीवन-मृत्युचे रेषाखंड तोडुन दोन जीव
एक श्वास व्हावे ..
शब्दखुणा: