लोकसंख्येवर ( लिहून) बोलू काही.

Submitted by परत चक्रम माणूस on 25 July, 2019 - 00:52

आपल्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटींवर गेली आहे. सद्यस्थितीत आणखी बऱ्याच कोटींची भर पडली आहे. पुर्वीचं एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती येऊन दशकं लोटली. आता प्रत्येकाला स्वतंत्र घर हवं असतं. एका घरात स्वतंत्र खोल्या हव्या आहेत. स्वतंत्र गॅजेट्स, वाहनं असे स्व मालकीचं असावं यासाठी सगळा आटापिटा चाललेला दिसतोय.
या सगळ्याचा विचार केला तर वाढलेल्या गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण सुरू आहे व बेकारी हटवण्यासाठी सरकारही औद्योगिकीकरणाला चालना देत आहे. हे सगळे करताना. जंगल, सुपिक शेतजमीन, जलस्त्रोत यावर अतिशय वाईट रितीने अतिक्रमण होत आहे. शहरांचा विकास कितीही केला तरी काम शोधत येणारे माणसांचे लोंढे शहरातील सुविधांवर ताण आणून प्रगतीवर पाणी फिरवत आहे.
सरकार कुटुंब नियोजन, हम दो हमारे दो असे कुठेतरी फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावू पाहतंय पण ते परिणामकारक नाहीत.
देशाला अतिशय कडक धोरण या बाबतीत घेणे गरजेचे आहे. नाहीतर गुन्हेगारी, प्रदुषण, अपघात या गोष्टी वाढतच राहतील व एकदिवस निसर्ग कोलमडून पडेल. यावर उपाय सुचवावेत ही विनंती.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लोकसंख्यावाढीचा फुगवटा येत्या काही दशकात फुटेल. गेल्या १५-२० वर्षांत लग्न झालेल्या लोकसंख्येपैकी जवळजवळ ५०% दांपत्य १ पेक्षा अधिक मुले होऊ देत नाहीत. २ मुले असणारी दांपत्ये २५% असावीत तर मुले नसणार्‍या दांपत्यांचे प्रमाण खुपच वाढलेले आहे (कदाचीत १०% असावे). उरलेली १५% दांपत्ये कदाचीत २ पेक्षा अपत्ये जन्मास घालत असावीत असे ग्रूहीत धरले तरी त्यातील किती मुले गरीबीमुळे १० वर्षांची होत असतील हे माहित नाही.

असंच आसपासच्या/सोसायटीतल्या/भावकीतल्या/नातेवाईकांतील/कामवाल्या/शेतमजुर दांपत्यांच्या मुलांची संख्या बघुन ठरवले.. चुकले काय माझे..??

नाही. बहुतेक शहरातील लोक जागरूक झाले आहेत. मुलांचे संगोपन, शिक्षण व लग्न या गोष्टींना येणारा खर्च, होणारी कुतरओढ हे पाहून शहरातील मध्यमवर्गीय लोकांनी बदल केला आहे, पण अजून ग्रामीण भागात कमीत कमी तीन मुले आहेत जास्तीत जास्त पाच पर्यंत. हे झाले महाराष्ट्राचे. बिमारु राज्यांत अजून काही बदल दिसून येत नाही.

मी महाराष्ट्रातलीच आकडेवारी अनुभवावरुन सांगितली. माझे नोकरीचे ठिकाण जरी शहरी भागातील असले तरी माझे मूळ गाव आणि ईतर नातेवाईक खेडोपाडी आहेत. त्यांच्याकडे सतत जाणे-येणे असल्याने मला तरी गेल्या १५-२० वर्षांत कुणाला ३ अथवा त्यापेक्षा जास्त मुले झालेले ऐकिवात नाही. आता बिहार-युपी मधे काय होत आहे त्याबद्दल मला सांगता येणार नाही. परंतु बहुतेक सर्वांना कुतरओढीची जाणीव झालेली दिसते.

अपल्या घरात कामाला येणार्या बायकांना किती मुले आहेत विचारा म्हणजे डोळे विस्फारतील !
या गटात (जी लोकसंख्ये मधे बहुसंख्य आहेत) ; तिथली परिस्थीती वेगळी आहे.

माझ्या घरी एकही कामगार नाही पशुपत जी. तुमचा मुद्दा रास्त आहे. लाखो करोडो लोक या भारतात असे आहेत. की ज्यांचे हातावर पोट आहे. ना बचत, ना काही स्थावर जंगम मालमत्ता. स्वत:चे पोट भरता भरता नाकी नऊ. तरीही पोरं होताहेत चार पाच. आता यातील किती चांगले शिक्षण घेतील, मालमत्तेचे मालक होतील. ते सुद्धा परिस्थिती बरोबर दोन हात करण्यात संपून जातात. काही गुन्हेगारीकडे वळतात. चोऱ्या, दरोडा, सुपारी घेऊन खून करणे, अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, वेश्याव्यवसाय याकडे काही जातात.
सरकार फार मोठा वाटा करदात्यांच्या पैशातून या लोकांना सोयी सुविधा पुरवू पाहते पण गलिच्छ वस्ती, झोपडपट्टी दरवर्षी वाढतच असते. वरून बुध्दीवादी, राजकारणी लोकांना अशा गरीब लोकांविषयी फार ममत्व असते.
एकंदरीत दुष्टचक्रात अडकल्यासारखे हे लोक तिथेच राहतात. पण लोकसंख्येचा डोंगर वाढतच राहतो.

आमच्याकडे गेल्या १० वर्षात ३ कामवाल्या झाल्या. प्रत्येकीची लग्नं होऊन १०-१२ वर्षं झालेली.. त्यांना १ मुलगा अन एक मुलगी अशी २ च अपत्ये आहेत.

बादवे - आपल्या स्वतःच्या अथवा भावा-बहिणींछ्या मुलांना त्यांच्या वर्गातील मुलांना किती भावंडे आहेत हा प्रश्न विचारुन माहिती काढायला सांगा.. म्हणजे २+ असणार्‍या कॅटेगरीत कोणीही नाही याची खात्री पटेल.

डीजे भाऊ असू शकते, कामवाल्या अनेक पिढ्या शहरात स्थाइक झाल्यामुळे असेल. पण बहुतेक उत्पन्न आणि मुलांची संख्या व्यस्त प्रमाणात असतात.

२० वर्षात ५-७ बायका बदलल्या असतील आमच्याकडे
त्यामधे आतापर्यंत फक्त २ बायकांना १ आणि २ मुले आहेत ... बाकी सगळ्यांना ३+

भारता समोरच्या किंवा आपल्या दैनंदीन जीवनातील एकूण प्रॉब्लेमपैकी ७० टक्के प्रॉब्लेम चे मूळ हे अति लोकसंख्येमधे सापडेल.

साठ सत्तर च्या दशकात पाचापेक्षा जास्त मुले असत व यातून एखादाच शिकून पुढे जात होता. आता बराच बदल झाला आहे पण विभक्त कुटुंबपद्धती असल्याने गरजा वाढल्या. स्थलांतर वाढलं. मोठ्या प्रमाणावर लोकांना दूर देशांमध्ये मिळतील ती कामे करून जगावे लागते. किंवा तिकडे पैसा कमावून भारतात पाठवावा लागतो.‌

मागे बाबा रामदेव यांनी हाच प्रश्न सार्वजनिक माध्यमात विचारला होता व सरकारने लवकरात लवकर लोकसंख्या नियत्रंण कायदा करावा असे म्हटले होते. त्यांच्या ह्या म्हणण्यावर देशातील अनेक पुरोगामी, विचारवंत, बुद्धीजीवी व शांताताप्रिय लोकांनी, आमच्या धर्मावर घाला घालयाचा प्रयत्न वर्तमान प्रतिगामी सरकार करत आहे असा ओरडा केला होता. त्यामुळे सध्यातरी असा काही कायदा सरकार करेल असे वाटत नाही.

महत्त्वाचा मुद्दा.

सर्वांनी 'हम दो हमारा एक' असे तत्व पाळावे. लोकसंख्या मर्यादित राहाणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

सुमित, मधुरा जी जी धन्यवाद. हम दो हमारा एक हे काही लोक काळाची पावले ओळखून अंमलात आणत आहेत. पण सक्तीने अंमलबजावणी केली जायला हवी. रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरी कठोर कारवाई करुन थांबवली पाहिजे.

'हम दो हमारा एक' तितकीशी चांगली कल्पना नाही. सद्ध्य चीन मधे एक्कल्कोंड्या पाल्यांची संख्या भरमसाठ वाढल्यामुळे नवीन सामाजिक समस्या उद्भवु लागल्या आहेत. एकाला दोन असलेली केव्हाही बरी असे मला वाटते.

चीन मध्ये काही शहरात शुद्ध हवा विकत घ्यावी लागते असे वाचले होते तीच वेळ आपल्यावर येणार आहे. डंपिंग ग्राउंड शेजारच्या वस्त्या, कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोक कसे जगत असतील याची कल्पना करवत नाही.

हा लोकसंख्या वाढीचा मुख्य मुद्दा नाही पण एक फ्याक्टर रिव्हर्स वाला देखील आहे. ज्यांना दोन मुलगे होतात ते मुलगी असावी म्हणून तिसरे अपत्य करतात. बरेच कुटुंबे दसतात ज्यांना तीन मुलगे किंवा दोन मुलगे आणि एक मुलगी आहे .

मी तर म्हणतो मुली पाच असल्या तरी चालेल. स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली तर बरेच प्रश्न सुटतील. वंशाचा दिवा लावून लावून काय उपयोग नाही.

आपल्या देशातील हा शब्द वापरून सर्व
राज्यांना एकाच पातळीवर आणायची गरज नाही देशातील काही राज्यातच ( उत्तरेच्या) लोकसंख्या वाढत आहे त्या मुळे सर्वात मोठी अडचण झाली आहे देशाची दक्षिणेची राज्य आणि महाराष्ट्र सुधा लोकसंख्या नियंत्रणात अग्रेसर आहे

राज्या नुसार जन्मदर काय आहे हे गूगल वर शोधलं की माहीत पडेल .
लोकसंख्या वाढीला कोणती राज्य जबाबदार आहेत .
महाराष्ट्रात स्थलांतरित लोकांची संख्या २/३ करोड तरी असेल ती वजा केली तर महारष्ट्र हे राज्य भरमसाठ लोकसंख्या वाढीला जबाबदार नाही.

"लगता है आनेवाले कुछ सालोमें 'साली' नामक जमातही खतम हो जायेगी" Happy
आजच टिकटॉकवर विडीयो पाहिला होता, इथली चर्चा वाचून आठवला.

कुणाला किती मुले असावी हे इतरांनी ठरवू नये. त्यांची इच्छा आणि त्यांची ऐपत.

<<< जंगल, सुपिक शेतजमीन, जलस्त्रोत यावर अतिशय वाईट रितीने अतिक्रमण होत आहे. >>>
याची काळजी करू नका. The planet is fine, the people are fucked. हे बघा. https://youtu.be/EjmtSkl53h4

Pages