जाण

सामान्यजाण(कॉमनसेन्स) बद्दलचे काही प्रश्न

Submitted by केअशु on 5 July, 2019 - 09:17

"जरा कॉमनसेन्स वापर ना? इतकी साधी गोष्ट कशी नाही समजली रे तुला?, अरे जरा डोकं वापरलं असतंस तर प्रॉब्लेम सहज सुटला असता." ही आणि अशाच अर्थाची अनेक वाक्ये तुम्ही अनेकदा ऐकली असतील.काहीवेळा इतरांबाबत वापरलीही असतील.एकूणात कॉमनसेन्स ही फार उपयोगाची गोष्ट आहे हे आपणा सर्वांनाच माहीतीये.या कॉमनसेन्सबद्दल पडलेले काही प्रश्न.
माबोकरांचे वाचन,अनुभव यात मदत करु शकेल असे वाटते. _/\_

१) कॉमनसेन्स म्हणजे नेमकं काय?

२) कॉमनसेन्स नेहमी दुर्मिळ का असतो?

३) कॉमन सेन्स वाढवता येतो का?

४) कॉमनसेन्स कसा वाढवावा?

५) कॉमन सेन्स आणि तर्कज्ञान एकच का? की वेगवेगळे?

विषय: 
शब्दखुणा: 

जाण

Submitted by Asu on 6 March, 2019 - 09:36

जाण

हाती काही नुरले आता
दिले तुम्हा भरमाप
उतारवयातील शैशव
मुलांनो,
तुम्हीच आता मायबाप

उरफुटेतो धावलो तेव्हा
आता लागते धाप
श्वास असेतो तरी व्हा
मुलांनो,
तुम्हीच आता मायबाप

जिवंतपणी भोगीत सडतो
जगणे झाले शाप
देवदयेची वाट पाहतो
मुलांनो,
तुम्हीच आता मायबाप

अवती भवती असती गिधाडे
पाहून होतो थरकाप
दुर्बळ अंगी पाय धडपडे
मुलांनो,
तुम्हीच आता मायबाप

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जाण