सामान्यजाण(कॉमनसेन्स) बद्दलचे काही प्रश्न

Submitted by केअशु on 5 July, 2019 - 09:17

"जरा कॉमनसेन्स वापर ना? इतकी साधी गोष्ट कशी नाही समजली रे तुला?, अरे जरा डोकं वापरलं असतंस तर प्रॉब्लेम सहज सुटला असता." ही आणि अशाच अर्थाची अनेक वाक्ये तुम्ही अनेकदा ऐकली असतील.काहीवेळा इतरांबाबत वापरलीही असतील.एकूणात कॉमनसेन्स ही फार उपयोगाची गोष्ट आहे हे आपणा सर्वांनाच माहीतीये.या कॉमनसेन्सबद्दल पडलेले काही प्रश्न.
माबोकरांचे वाचन,अनुभव यात मदत करु शकेल असे वाटते. _/\_

१) कॉमनसेन्स म्हणजे नेमकं काय?

२) कॉमनसेन्स नेहमी दुर्मिळ का असतो?

३) कॉमन सेन्स वाढवता येतो का?

४) कॉमनसेन्स कसा वाढवावा?

५) कॉमन सेन्स आणि तर्कज्ञान एकच का? की वेगवेगळे?

६) विचार करण्याची गती/आकलनक्षमता कशी वाढवावी?

ज्ञानमदत करणार्‍या सर्वांचे आधीच आभार! _/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कॉमन सेन्स म्हणजे तारतम्य.
Common sense is not common असे कुणीतरी म्हटले आहे कारण बऱ्याचदा माणूस अनुभवातून शिकत नाही.
(स्वतःच्या किंवा इतरांच्या) अनुभवातून न शिकणे आणि तीच चूक पुन्हा करणे म्हणजे कॉमन सेन्सचा अभाव.

कॉमन सेन्स >>> अनुभवातुन आलेले किंवा उपजत असलेले ज्ञान जे शिकुन मिळत नाही.
कॉमन सेन्स लोकांचे निरिक्षण करून, त्यांच्यात असलेल्या चांगल्या गुणांचे अवलोकन करून डेव्हलप करता येतो. पण त्यासाठी तुम्ही शिकण्याची तयारी दाखविली पाहिजे.