मभादि२०१९

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - गोजिरे बोल

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 14:08

नमस्कार मंडळी..

आपल्याला माहितीच आहे की यंदाही २७ फेब्रुवारीपासून आपण मराठी भाषा दिवस मायबोलीवर साजरा करणार आहोत. पुढच्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागण्यात थोडा हातभार लागावा म्हणून मायबोलीकरांच्या मुलांसाठी मजेचे उपक्रम आपण नेहमीच आयोजित करत असतो. ह्याच हेतूने आपण यावर्षी गोजिरे बोल हा उपक्रम घेणार आहोत. त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे उत्साहाने सहभागी व्हाल याची आम्हाला खात्री आहे!

IMG-20190209-WA0004_0.jpg

विषय: 

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - साहित्य वाचन

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 13:45

नमस्कार मंडळी,

एकवीस वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या मराठी पाऊलखुणा शोधणारी मायबोली आता जालविश्वात चांगलीच स्थिरावली आहे. जगभरातील मराठी माणसे मायबोलीच्या या प्रेमळ धाग्यात गुंतून गेली आहेत.
आजपर्यंत मायबोली केवळ लिखित स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचत होती. लिखित माध्यम सर्वदूर पोहोचण्यासाठी सोयीचे असले तरी लेखनाचा आशय, अनुभूती वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने त्याला काही मर्यादा येतात.
इंटरनेटचा सर्वदूर वापर सुरु झाल्यावर या मर्यादा पार करण्यासाठी व्हिडीओ ब्लॉगचे काही प्रयोगसुद्धा झाले.

विषय: 

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - विज्ञानभाषा मराठी

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 13:26

नमस्कार!

प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या ’ रामन इफेक्ट’ या नोबेल पारितोषिकविजेत्या संशोधनाच्या सन्मानार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. भारतातल्या विविध संशोधन संस्थांमध्ये या दिवशी विज्ञान प्रदर्शने, व्याख्याने इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने यावर्षी आपण मायबोलीवरही विज्ञान दिन साजरा करत आहोत. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय विज्ञानभाषा मराठी हा उपक्रम!

विषय: 

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - मोरपिसारा

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 13:18

चतुरस्र व्यक्तिमत्त्व या संकल्पनेचं मराठी माणसाला सर्वाधिक प्रिय असलेलं रूप म्हणजे पु. ल. देशपांडे! लेखक, संगीतकार, पटकथा-संवादलेखक, दिग्दर्शक, वक्ते, आकाशवाणीवरील निर्माते, हार्मोनियमवादक, शास्त्रीय संगीताचे रसिक, सामाजिक काम करणार्या संस्थांना सढळहस्ते मदत करणारे पुलं म्हणजे ’ अष्टपैलू’ या शब्दाची मूर्तिमंत व्याख्याच जणू! महाराष्ट्राच्या या लाडक्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या जन्मशताब्दीनिमित्ताने यावर्षीच्या मराठी भाषा दिवसामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत मोरपिसारा हा उपक्रम!

विषय: 
Subscribe to RSS - मभादि२०१९