चित्रकार - आरोही कुलकर्णी (वय - ८.५ वर्षे)
यंदाच्या गणपतीत दोन गणपती स्वतःच बनवले आणि त्यामुळे नंतर त्याची चित्र किती काढू आणि किती नको अशी परिस्थिती होती, हा गणपती मित्राला दिलेल्या वाढदिवसाच्या भेटकार्डावर काढलेला आहे.

चित्रकार - विभास कुलकर्णी (वय - ५.५ वर्षे)
स्वतःच्या मनानी काढलेले चित्र. कुठलीही मदत घेतलेली नाही. (सध्या कुठल्याही प्रकारच्या सूचना नको असतात.. मी मला पाहिजे ते करणार ह्या मोड मधे आहे, आणि डोक्यावर ताईचा हात आहे त्यामुळे ती कशी स्वतः काढते तसेच मी पण काढणार)

खर तर ही रेसेपी हळू-हळू निर्माण होत गेली आज. औफीसात काल सायेबाने काल त्यांच्या बागेतल्या वेग वेगळ्या टाईपच्या मिरच्या आणून दिल्या. बाहेर मस्त रिमझीम चालू पाहून मिरची-भजी करायचा विचार होता खरेतर पण आमचे धनी सध्या डाएट आहे. त्यामूळे ह्या रेसेपीचा जम्न झाला आज. असो: