ओढ

ओढ

Submitted by Asu on 27 September, 2018 - 23:06

ओढ

ओठ न विलगता
हाक ऐकू यावी
ऐकले न ऐकले
मनास भ्रांत व्हावी

चारचौघात कशी रे
तुजला मी खुणावू
प्रेम न माझे उठवळ
कशी तुज समजावू

शब्दांवाचून तुजला
कळेल का मनातले
भावभावनांचे नाते
नसते रे क्षणातले

गंध निशिगंधाचा
दरवळतो जनात
अव्यक्त भावनांचा
परि रेंगाळतो मनात

अव्यक्त प्रीत माझी
कुणा ना दिसावी
चकोरासम चांदण्याची
एकमेकां ओढ असावी

शब्दखुणा: 

नदी आणि सागर

Submitted by vaijayantiapte on 16 April, 2018 - 23:37

ओढ उत्कट सागराला भेटण्याची
सागरामुळेच वाढे सुंदरता नदीची

खळखळ वाहत जाइ सागराच्या जवळी
त्या आनंदे नृत्य करी , नदी गाई गाणी

गूढ , मंजुळ आहे गाज सागराची
नदीला सदैव म्हणूनी ओढ सागराची

सागरामुळेच मिळे नदीला गती
काठ ओलांडूनी वाहे मुक्त, संयत नदी

शुद्धता, नितळता अंतरंग नदीचा
म्हणूनी सामावतो, स्वतःमध्ये नदीला

......वैजयंती विंझे -आपटे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ओढ