ओढ

Submitted by Asu on 27 September, 2018 - 23:06

ओढ

ओठ न विलगता
हाक ऐकू यावी
ऐकले न ऐकले
मनास भ्रांत व्हावी

चारचौघात कशी रे
तुजला मी खुणावू
प्रेम न माझे उठवळ
कशी तुज समजावू

शब्दांवाचून तुजला
कळेल का मनातले
भावभावनांचे नाते
नसते रे क्षणातले

गंध निशिगंधाचा
दरवळतो जनात
अव्यक्त भावनांचा
परि रेंगाळतो मनात

अव्यक्त प्रीत माझी
कुणा ना दिसावी
चकोरासम चांदण्याची
एकमेकां ओढ असावी

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults