(.)

चहाचा एक कप

Submitted by Pradipbhau on 18 February, 2018 - 12:35

15 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय जागतिक चहा दिन. मध्यंतरी एक जाहिरात पाहण्यात होती. त्यात म्हटले होते की बाईने कुंकवाला अन मर्दाने चहाला नाही कधी म्हणू नये. मी तर चहाचा पहिल्या पासून चाहता आहे. दिवसातून मला किमान दोन तीन वेळा तरी चहा लागतोच. एक परी जेवण मागे पुढे झाले तरी चालेल मात्र चहाची वेळ चुकता कामा नये. मला शुगर असल्याने डॉक्टर नी गोड खाणे सोडण्याचा सल्ला दिला. मी त्यांचा सल्ला काही अंशी मानला मात्र चहाच्या बाबतीत मानला नाही. काही लोक चहा पेक्षा काँफी, कोको, दूध पिणे चांगले असा सल्ला देतात. माझ्या मते चहा तो चहाच. त्याची सर अन्य कोणत्याही पेयाला येत नाही.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - (.)