चहाचा एक कप

Submitted by Pradipbhau on 18 February, 2018 - 12:35

15 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय जागतिक चहा दिन. मध्यंतरी एक जाहिरात पाहण्यात होती. त्यात म्हटले होते की बाईने कुंकवाला अन मर्दाने चहाला नाही कधी म्हणू नये. मी तर चहाचा पहिल्या पासून चाहता आहे. दिवसातून मला किमान दोन तीन वेळा तरी चहा लागतोच. एक परी जेवण मागे पुढे झाले तरी चालेल मात्र चहाची वेळ चुकता कामा नये. मला शुगर असल्याने डॉक्टर नी गोड खाणे सोडण्याचा सल्ला दिला. मी त्यांचा सल्ला काही अंशी मानला मात्र चहाच्या बाबतीत मानला नाही. काही लोक चहा पेक्षा काँफी, कोको, दूध पिणे चांगले असा सल्ला देतात. माझ्या मते चहा तो चहाच. त्याची सर अन्य कोणत्याही पेयाला येत नाही. आपण कितीही थकलेले दमलेले असो चहाचा एक कप तरतरी आणल्या शिवाय रहात नाही. गोरगरीबांचे सर्वात स्वस्त पेय म्हणून चहाकडे पाहिले जाते. घरातील चहा वेगळा गाड्या वरील चहा वेगळा. मित्रांसोबत दोन कटींग अशी आँर्डर देवून चहा पिण्यात एक वेगळीच मजा असते. गप्पा मारत मारत एक कप चहा कधी संपतो तेच कळत नाही. चहाचा कप हे मैत्री जुळविण्याचे एक खास साधन मानले जाते. दोन माणसे कधीही एकत्र भेटली की चला चहा घेऊ या असे म्हणत मैत्रीचा धागा अधिक भक्कम करतात. चहाचा एक कप मैत्री जुळवतो तसेच फार दिवसाचे वैमनस्य देखील दूर करतो. प्रेम जुळविण्यात तर चहाचा कप चांगलीच मध्यस्ती करतो. प्रथम भेटलेल्या प्रेेेमी युगुलात बोलण्याचे धाडस चहाच्या एका कपाने येते. चहा पिण्याच्या प्रत्येेेकाच्या पध्दती वेगवेगळ्या आहेेत. कोणी आमटी भुरकल्यासारखा चहा भुरकूूून पितात. कोणी स्वतःची मिशी चहाच्या कपात बुडवून मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतात. मी तर चहाला अम्रुतासमान मानतो. चहाचे प्रकार देखील आहेत. साधा चहा, स्पेशल चहा, दुधाचा चहा, कोरा चहा, गवती चहा, साखरेचा चहा, गुळाचा चहा. प्रत्येकाची चव वेगळी. घरी एखादा पाहुणा आला की पाण्याचा तांब्या (पाणी पिण्यासाठी) व चहाचा कप देण्याची आपली संस्क्रुती आहे. मी चहा घेत नाही असे म्हणणार्या लोकांचा मला भलताच राग येतो. चहा म्हणजे अम्रुत त्याला नाकारणारा माणूस राक्षस कुळातील असला पाहिजे. चहा पिऊ नये असे सांगणारी मंडळी आता जगू नये असे सांगणार्या मंडळी सारखी मला वाटतात. पूर्वी 50 पैसे चहाचा कप टपरीवर होता आज तो पाच रूपयावर गेला आहे. स्टार हाँटेल मध्ये तर त्यासाठी 75रूपये मोजावे लागतात. आपल्या प्रियसीला घेऊन हाँटेल मध्ये जाऊन एक कप चहा मध्ये एक घोट तिने व एक घोट आपण पिण्यामध्ये मजा काही औरच आहे. लग्न जुळवताना सुध्दा पोहे चहालाच महत्व आहे. विविध संस्थातून टी क्लबची कल्पना चहा शौकिनामुळेच निघाली. असा हा चहा स्पर्धेच्या युगात आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यात म्हटले होते की बाईने कुंकवाला अन मर्दाने चहाला नाही कधी म्हणू नये.
>>>>>
काळ बदलला आहे. हल्ली मुली सुद्धा मुलांसोबत चहाच्या टपरीवर चीअर्स करत दोन दोन घोट मारताना दिसतात.

गोरगरीबांचे सर्वात स्वस्त पेय म्हणून चहाकडे पाहिले जाते.
>>>>>>
हा काळ देखील ईतिहासजमा झाला आहे. आम्ही कॉलेज कॅंटीनला दोन दोन रुपयात चहा प्यायचो. पण आता कुठल्याही कळकट मळकट टपरीवर सुद्धा सात-आठ रुपयाला कटींग मिळतो.

प्रथम भेटलेल्या प्रेेेमी युगुलात बोलण्याचे धाडस चहाच्या एका कपाने येते.
>>>>>>
ईथे काळ बदलून एक जमाना झालाय. हल्ली डेट म्हटले की कॉफीच. पोरीसोबत असताना चहा ऑर्डर केली तर आल्यापावली पळून जाईल.

असा हा चहा स्पर्धेच्या युगात आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
>>>>>>
बेसिकली चहा हे एक व्यसन आहे. त्याचे अस्तित्व माझ्यासारखे व्यसनी लोकं टिकवणारच. जसे महागड्या ब्रांडेड सिगारेटी आल्या आणि हुक्का बार उघडले म्हणून गायछाप तंबाखूच्या मळीची डिमांड काही कमी झाली नाही तसेच आहे हे.

चहा चे व्यसन फार बेकार. मी 1 वर्ष 2 मंथ सोबर आहे.. चहा सोडून.
दारू कशी वीकएंड किंवा महिन्यातून 1 - 2 पेग होतो.
चहा मात्र रोज पितात लोक. चहा पण ओकेशनलली पिणे जरूरी आहे.

अहो च्रप्स, काहीही काय
चहा हे एक व्यसनच आहे हे मान्यच
पण प्रमाण आणि परीणामांबाबत दारूशी तुलना करणे म्हणजे दारूचे उदात्तीकरण करण्यासारखे..