मराठी गझल

मनासारखे

Submitted by क्रांति on 25 May, 2009 - 23:36

हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे

तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे

मुठीत बांधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे

खुळे तुझ्या स्वप्नात जागते,
मना करू दे मनासारखे

दंवात न्हाते पहाट ओली,

गुलमोहर: 

हे सुगंधाचे निघाले काफिले!

Submitted by मानस६ on 24 May, 2009 - 08:15

हे सुगंधाचे निघाले काफिले!
मी असे हृदयात कोणा स्थापिले?

रुक्ष रस्ता एवढा नव्हता कधी!
ओळखीचे झाड कोठे राहिले?

रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो,
पण व्रताने, हाय! मजला शापिले!

गुलमोहर: 

त्रास

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 May, 2009 - 00:52

आठवांचे फास काही
कोंडलेले श्वास काही

भोवती अंधार लाटा
जाणिवांचे भास काही

रात्र जागी आर्त वेडी
मोजते ती आस काही

सुख म्हणे येथेच आहे
लागतो का वास काही ?

वाकुल्या पोटास दावी
फेकलेले घास काही

काय सांगू रे तुला मी....

गुलमोहर: 

कविता

Submitted by pulasti on 22 May, 2009 - 14:14

वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता

"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?

गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता

गुलमोहर: 

घोळके

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 May, 2009 - 07:11

फोफावतात घोळके
सोकावतात घोळके

दारातल्या फटीतुनी
डोकावतात घोळके

मोडून मान मेंढरे...
बोलावतात घोळके

उष्टावळीवरी पुन्हा
घोंगावतात घोळके

रस्त्यात कोण वारले ?
ओलावतात घोळके

पाठीस घाव लागता
रोडावतात घोळके

गुलमोहर: 

रात्र आधी मोजतो

Submitted by जयन्ता५२ on 15 May, 2009 - 18:16

रात्र आधी मोजतो
स्वप्न मग मी बेततो

श्वास थोडे मोडुनी
दिवस नगदी आणतो

ओळखी झाल्या शिळ्या
नजर ताजी शोधतो

एक ना तारा नभी
आणि चकवा भेटतो

सांगणे होते कुठे?
शब्द ओठी कांपतो

विकत मिळते सावली
कोण झाडे लावतो?

सोडले ते घर तिने?

गुलमोहर: 

राणी

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 May, 2009 - 06:16

सवे तारकांची ,जणू होड राणी
तुझ्या सोबतीची, मिठी गोड राणी
मिटे मोगराही, झणी माळता तू
तुझा गंध मोडी, भली खोड राणी
रुते पाश देही, तुझ्या कुंतलांचा
नको कोणताही, वरी तोड राणी
झळी वेदनांच्या, विझे खिन्न काया
हसू शिंपता ये, मना मोड राणी

गुलमोहर: 

काळजात आठवण फुलापरी जपायची

Submitted by मिलिंद on 12 May, 2009 - 06:43

काळजात आठवण फुलापरी जपायची
गंध देउनी जगास, सल उरी जपायची

आणखी कुणी करेल का जतन तुझ्यापरी ?
तूच, काळजा, तुझ्यातली सुरी जपायची

एव्हढे जवळ असूनही किती दुरावलो
सात पावलांतली अता दरी जपायची

मंदिरी मनातल्या तिला असे पुजायचे

गुलमोहर: 

फार आता फार झाले

Submitted by जयन्ता५२ on 8 May, 2009 - 14:39

फार आता फार झाले
श्वास घेणे भार झाले

पेटता वणवे तमाचे
सूर्य सारे गार झाले

सज्जना त्या जलसमाधी
घोर पापी पार झाले

पाय धरती एकदा,मग
पाच वर्षे स्वार झाले

"शांतिवार्ता सफल झाल्या"
आणि त्यांचे वार झाले!

आमचे इतिहास अंती

गुलमोहर: 

शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले

Submitted by मृण_मयी on 8 May, 2009 - 02:23

शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले
दे अर्थ आता जगण्यास; पुष्कळ झुलवून झाले

तुजवीण हाती काही न उरले माझे म्हणाया
बाकी जगावर केव्हाच पाणी सोडून झाले

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल