कविता

Submitted by pulasti on 22 May, 2009 - 14:14

वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता

"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?

गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता

उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?

कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!

गुलमोहर: 

>> कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
>> कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
Happy

>> पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!

लहजा आवडला.

>>>पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता! <<<<

सुन्दर .. Happy

'वेड्यास' एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली 'उन्हात' कविता

कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?

सही कविता.....!

टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता

एक नंबर!!!

मस्त

जन्मास आलो तेव्हा गायली होती आई
मरतानाही लोक आता रडतात कविता

.....
चुक भुल द्यावी घ्यावी!!!

मस्त

कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
छानच

सुधीर

अहाहा !
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

सहीच सगळे !!!
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?.......... फारच आवडला.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!..
.......... क्या बात है सरजी..... सही Happy
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!

अप्रतिम.... खुप आवडले हे शेर !!!

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

सरजी...........एकसे एक कातील शेर!

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!>>>> एकदम खल्लास ! Happy

"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?

व्वा!!

कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?

सुंदर!!

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!

व्वा!!

कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!>>>>>>>>>>>>>>>> अप्रतिम!!!!! मस्तच!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

अतिशय सुंदर गझल !!! मस्तच !

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता! >>>> अहाहा .... बहोत खूब!

परागकण

मित्रा मस्त!तोडलस!!
*************************
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?

*************************

समजली जगाला,उमजली जगाला.
जमली तुला रे मस्त ही कविता...

-शंतनु घारपुरे

उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता? >>> ह्या साठी तुला कंठा कढुन दिला असता मित्रा.. Happy वाह...!!!

काय उतरला आहेस.... वाह !!!!!!!!!! ़आय बोलू अजुन.. बाकी शेर शिरत नाही आहे.. हा व्यपला आहे. बरेच दिवस राहील घोंगावत मनात. हे मी चोरणार, कारण ते तसच मनात रहाणार नाही ना....

सर्वाना मनापासून धन्यवाद!

सत्या - दे बाबा कंठे बिंठे दे... या रिसेशनमधे फार गरज आहे Happy Happy

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!>>>

आवडला. Happy

बरेच दिवसांनी चांगली कविता वाचावयास मिळाली. आनंद झाला.
*************************************************
मामनुस्मरं युध्दंच |

फारच सुंदर. आरपार.
.............................................................................
गावोगावी बापू झाले, बापूंचेही टापू झाले
भक्त आंधळे न्हाले न्हाले, देव बनूनी बापू आले!

सत्या - दे बाबा कंठे बिंठे दे... या रिसेशनमधे फार गरज आहे >> निट वाच ... >>>ह्या साठी तुला कंठा कढुन दिला असता <<<<:( आमच्या इथे रेफरल आणा आणि २ मुव्ही टिकीटं मिळावा असा ई -मेल आला आहे Happy आता बोला Sad Proud च्यामारी आठवण काढु नको..पण माबोवर कवितांना नो फरक.

व्वा !! जबरदस्तचं...

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता! >>> अप्रतिम. शब्द आणि शब्द आवडला.

Pages