त्रास

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 May, 2009 - 00:52

आठवांचे फास काही
कोंडलेले श्वास काही

भोवती अंधार लाटा
जाणिवांचे भास काही

रात्र जागी आर्त वेडी
मोजते ती आस काही

सुख म्हणे येथेच आहे
लागतो का वास काही ?

वाकुल्या पोटास दावी
फेकलेले घास काही

काय सांगू रे तुला मी....
'त्रास' देती त्रास काही

गुलमोहर: 

हम्म. आठवांचे फास, फेकलेले घास, सुखाचा वास आवडले.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

वा वा.. लहान बहरातील एक चांगली गझल,,,

आठवांचे फास काही
कोंडलेले श्वास काही.. ..छान

भोवती अंधार लाटा
जाणिवांचे भास काही.. वा

काय सांगू रे तुला मी....
'त्रास' देती त्रास काही.. छान शेर.
-मानस६

एकदम सही कविता यार

काय सांगू रे तुला मी....
'त्रास' देती त्रास काही

.एकदम class...............!

आठवांचे फास काही
कोंडलेले श्वास काही

छानच...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

व्वा कौतुक..मस्त गझल...शेवटचा शेर खुप आवडला...

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

गझल आवडली.
सुख म्हणे येथेच आहे
लागतो का वास काही ?

खूपच मस्त!

वाकुल्या पोटास दावी
फेकलेले घास काही

क्या बात हे
नितीन

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
"बहोत खूब! "