Submitted by सुपरमॉम on 30 June, 2008 - 12:14
आयुष्याच्या रंगपटावर
ऊन पावसाची बरसात असते.
कधी खेळ संपलेला भासतो,
ती स्वप्नपूर्तीची सुरुवात असते.
काट्याकुट्यांतून चालताना
कधी पावलं रक्तबंबाळ होतात,
पुढच्याच वळणावर अकस्मात
फुलांचे ताटवे भरभरून उमलतात.
रणरणत्या तप्त उन्हात,
कधी जिवाची काहिली होते,
ध्यानीमनी नसताना कधी
आभाळाचीच सावली होते.
म्हणूनच...
रस्त्यातल्या अडथळ्यांना घाबरायचं नसतं.
ठेच लागली तरी सावरायचं असतं.
वादळवार्याच्या मार्यातूनही..
स्वप्नांचं इंद्रधनुष्य जपायचं असतं.
-मधुरिमा.
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख!
सुरेख!